वैज्ञानिक संशोधन तसेच तंत्रज्ञानविषयक उपाययोजनांमुळे गेल्या काही वर्षांत मस्त्यव्यवसाय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय प्रगती झालेली दिसते. यावर्षीच्या राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन-2023 निमित्त आयोजित संमेलनात आधुनिक तंत्राचा स्वीकार करण्याप्रती आणि त्यातून मस्य उत्पादन वाढवण्याप्रती मस्त्यपालक शेतकरी, स्टार्ट अप उद्योग, नवोन्मेष यांचा समर्पित भाव दिसून आला.
केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्रालयाच्या अखत्यारीतील मत्स्यपालन विभागाने सर्व हितधारकांच्या सहकार्याने महाबलीपुरम येथे राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन – 2023 संमेलन आणि स्टार्ट अप परिषदेचे आयोजन केले होते. काल 10 जुलै 2023 रोजी सुरु झालेल्या या संमेलनाचा समारोप आज 11 जुलै 2023 रोजी तमिळनाडूतील महाबलीपुरम या ऐतिहासिक शहरात झाला.
राष्ट्रीय मस्त्य शेतकरी दिन – 2023 निमित्त आयोजित संमेलनाने संपूर्ण देशाला मच्छिमार तसेच मस्त्यशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रचंड योगदान तसेच शाश्वत मत्स्यव्यवसाय विकासाप्रती त्यांचे समर्पण यांचा सन्मान करण्याची संधी उपलब्ध करून दिली.
जबाबदार पद्धती अनुसरून तसेच मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील क्षमतेचा वापर करून आपण समृद्ध भविष्याची सुनिश्चिती तसेच अन्न सुरक्षेत वाढ करू शकतो आणि त्यातून आपल्या देशाच्या समग्र विकासासाठी योगदान देऊ शकतो असा विचार या संमेलनाने दिला.
या संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी, केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्री पुरषोत्तम रुपाला यांनी केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धविकास राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन यांच्या उपस्थितीत संबंधित राज्य सरकारे तसेच केंद्रशासित प्रशासनांच्या मंत्र्यांशी संवाद साधून त्यांना मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या पीएमएमएसवाय, एफआयडीएफ, आणि केसीसी
या केंद्र सरकारच्या योजनांचा परिणामकारक वापर करून घेण्याचे निर्देश दिले. मच्छिमार, मत्स्य शेतकरी तसेच इतर संबंधित भागधारकांच्या शाश्वत भविष्यासाठी तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यांचा स्वीकार करण्याबाबत देखील केंद्रीय मंत्र्यांनी सूचना दिल्या. मत्स्य क्षेत्राशी संबंधित सर्व भागधारकांच्या सहभागामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
राज्याच्या काही भागात आज मुसळधार पाऊस; वाचा आजचा हवामान अंदाज...
मस्त्य क्षेत्राची प्रगती तसेच उद्योजकतेमध्ये वाढ, व्यवसाय नमुन्यांचे विकसन, व्यवसाय करण्यातील सुलभतेला, नवोन्मेषाला तसेच स्टार्ट अप्स, इन्क्युबेटर्स इत्यादींसारख्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येकाला योगदान देता येण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरणाची जोपासना करतानाच मस्त्यव्यवसाय क्षेत्रात अत्याधुनिक अभिनव संशोधनांचा समावेश करून घेण्यावर या कार्यक्रमात भर देण्यात आला.
मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला! राष्ट्रवादीला कोणती खाती मिळणार? संपूर्ण यादी तयार
Published on: 12 July 2023, 09:38 IST