News

आशिया आणि युरोपला जोडणारा आणि भू-राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा असणारा इजिप्तचा सुएज कालवा गेल्या चार दिवसांपासून ब्लॉक झाला आहे. सोसाट्याने सुटलेल्या समुद्री वाऱ्यामुळे माल वाहतूक करणाऱ्या एका महाकाय कार्गो शीपची दिशा बदलली आणि ते या कालव्यात अडकले.

Updated on 12 April, 2021 2:00 PM IST

आशिया आणि युरोपला जोडणारा आणि भू-राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा असणारा इजिप्तचा सुएज कालवा गेल्या चार दिवसांपासून ब्लॉक झाला आहे. सोसाट्याने सुटलेल्या समुद्री वाऱ्यामुळे माल वाहतूक करणाऱ्या एका महाकाय कार्गो शीपची दिशा बदलली आणि ते या कालव्यात अडकले.

त्यामुळे या समुद्री मार्गे होणारी वाहतूक थांबली आहे. या घटनेमुळे जगाचे दर तासाला तब्बल 2800 कोटी रुपयांचे नुकसान होत असून नाशिकच्या द्राक्ष निर्यातदारांनाही याचा फटका बसला आहे.नाशिकचे द्राक्ष निर्यातदार राजाराम सांगळे यांचे 25 कंटेनर सध्या सुएझ कालव्यात अडकले आहेत. राजाराम सांगळे यांनी सांगितले की, "आशिया आणि युरोपला जोडणारा हा वन वे कालवा आहे. एका बाजूची ट्रॅफिक थांबली की दुसऱ्या बाजूची वाहतूक सुरू होते. दिवसाला या कालव्यातून ६० बोटी पास होत असतात.

पण गेल्या काही दिवसांपासून सर्वच बोटी येथे अडकल्या आहेत. त्यामुळे आमचे द्राक्षांचे २५ कंटेनर अडकले आहेत. तर संपूर्ण महाराष्ट्रातील हजारांहून जास्त असेल. पुढील तीन- चार दिवसांत सुरळीत झाले नाही तर अवघड होईल.""इजिप्तचा सीझन १५ मे रोजी सुरु होतो. उशिरा द्राक्ष पोहोचल्यानं त्याला किंमत मिळणार नाही आणि द्राक्षंही खराब होतील. तसेच एकाच वेळी भरपूर द्राक्ष गेली तर भावही कमी होईल आणि द्राक्षांना कवडीमोल भाव मिळेल. त्यामुळे शिपिंग लाईनसोबत आम्ही सतत संपर्कात आहोत. उद्या रविवारी एक मोठा प्रयत्न होणार आहे.

 

परिस्थिती पूर्ववत झाली नाही तर अवघड होईल. कोरोनाचा आधीच फटका बसला आहे, त्यात युरोपमध्ये आधीच आपल्या मालाची किंमत कमी झाली आहे.", अशी चिंताही द्राक्ष निर्यातदार राजाराम सांगळे यांनी व्यक्त केली.दरम्यान इजिप्तचा सुएज कालवा म्हणजे समद्रातील १९३.३ किमीचा एक चिंचोळा मार्ग. या कालव्यावर सत्ता गाजवण्यासाठी अनेक युध्दे झाली आहेत. सध्या सुएज कालवा इजिप्तच्या ताब्यात आहे. सुएज कालवा भूमध्य समुद्राला लाल समुद्राशी तसेच अटलांटिक महासागराला पॅसिफिक महासागराशी जोडतो, म्हणजेच आशियाला युरोपशी जोडण्याचे काम करतो.

मंगळवारी सकाळी 7.40 च्या सुमारास, चीनमधून माल भरुन एक कार्गो शीप नेदरलॅन्डला रवाना होत असताना या कालव्यात फसले. समुद्री वाऱ्याच्या जोराच्या झोक्याने या जहाजाला दुसऱ्या दिशेला फिरवले, त्यामुळे चालकाचे जहाजावरचे नियंत्रण सुटल्याने हे ४०० मीटर लांबीचे आणि ५९ मीटर रुंदीचे जहाज या कालव्यात फसले.

त्यामुळे हा समुद्री मार्ग ब्लॉक होऊन समुद्रात जहाजांचे ट्रॅफिक जाम झाल्याचे पहायला मिळत आहे. हा मार्ग आता खुला होण्यासाठी काही दिवस लागतील असे सांगण्यात येत आहे.

 

English Summary: Nashik's grape exporters were also hit due to blockage of Suez Canal
Published on: 27 March 2021, 11:25 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)