News

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत नाशिक सहकारी साखर कारखाना चालण्याचा निर्णय घेतलाय. बाजार समितीच्या सभासदांच्या ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला सभासदांनी मंजुरी दिल्यानंतर बाजार समितीच्या संचालक यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शासन स्तरावर याबाबत परवानगी घेण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

Updated on 11 July, 2021 10:35 AM IST

 नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत नाशिक सहकारी साखर कारखाना चालण्याचा निर्णय घेतलाय. बाजार समितीच्या सभासदांच्या ऑनलाईन  बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला सभासदांनी मंजुरी दिल्यानंतर बाजार समितीच्या संचालक यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शासन स्तरावर याबाबत परवानगी घेण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

नाशिक सहकारी साखर कारखाना सर्व याचा निर्णय नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या सर्वसाधारण बैठकीत एकमताने याबाबतीतला ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच संबंधित कारखाना चालवण्यासाठी सक्षम पार्टी, व्यवसायिकांनी संमती दर्शवली तर त्याला देखील पाठिंबा देणार असल्याचे जाहीर करण्यात आले. जर नाशिक सहकारी साखर कारखाना चालविण्यास कोणीही पुढे आले नाही तर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती चा कारखाना चालवण्यासाठी पुढाकार घेईल, असे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देविदास पिंगळे यांनी सांगितले आहे.

 

 त्यामुळे हा कारखाना नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीला चालवण्यास मिळावा यासाठी ची परवानगी मिळवण्यासाठी शासनाशी चर्चा सुरू आहे. तसेच या बाबतीत शासकीय स्तरावर पाठपुरावा करण्यात येत आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची बाजार समितीच्या संचालक मंडळाने नुकतीच  भेट घेतली. याबाबतीत सहकार मंत्र्यांनी प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. हा कारखाना सुरू करण्यासाठी चा प्रस्ताव नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्हा निबंधक कार्यालयाकडे सादर करणार असल्याची माहिती देखील देविदास मुंडे यांनी दिली.

 नाशिक सहकारी साखर कारखाना हा गेल्या सात वर्षापासून बंद आहे. गेल्या सात वर्षांपासून बंद असलेल्या कारखाना सुरू झाला तर हा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग यशस्वी ठरणार आहे. नाशिक सहकारी साखर कारखाना चे एकूण बाराशे कर्मचारी होते आता अवघे 135 कर्मचारी शिल्लक राहिले आहेत. 

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीला जर हा कारखाना चालविण्याची परवानगी मिळाली तर सध्या असलेली गाळप क्षमता बाराशे पन्नास टनांवरून 2500 ते 5000 टन पर्यंत पंधरा वर्षात नेऊ तसेच या कारखान्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात साखर निर्मिती करण्याचे प्रयत्नही करू असं बाजार समिती सभापतींनी सांगितले. तसेच गाळप क्षमता वाढवण्यासाठी लागणारे आवश्यक यंत्रसामग्री नवीन घेण्याची तयारीही दर्शवण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

English Summary: nashik sahakari saakhar kaarkhana
Published on: 11 July 2021, 10:35 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)