News

Nashik News : नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाला असून शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव दिवसेंदिवस घसरत चालले आहेत. सगळा खर्च जाऊन अक्षरश: हातात दोन आणि चार रुपये येत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज चक्क लासलगावात आंदोलन केलं. कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जगायचं कसं हा प्रश्न डोळ्यासमोर आहे.

Updated on 27 February, 2023 10:52 AM IST

Nashik News : नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाला असून शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव दिवसेंदिवस घसरत चालले आहेत. सगळा खर्च जाऊन अक्षरश: हातात दोन आणि चार रुपये येत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज चक्क लासलगावात आंदोलन केलं. कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जगायचं कसं हा प्रश्न डोळ्यासमोर आहे.

शेतकऱ्यांना त्यांच्या मुलांसाठी साधं 10 रुपयांचं चॉकलेट देखील घरी घेऊन जाता येत नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली लिलाव बंद पाडून आंदोलन सुरु केलं.

अशा स्थितीत शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव बंद पाडले. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी कांदा पिकावर रोटर फिरवून संताप व्यक्त करत आहेत तर अनेकजण फुकटात कांदा घेऊन जा असे आवाहन करत शेतकऱ्याची व्यथा मांडत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सकाळी कांद्याचे लिलाव रोखण्यात आले.

देशातील करोडो गरीब कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी खुशखबर, रुग्णालयात उपचाराबाबत सरकारने केली मोठी घोषणा

यावेळी शेतकऱ्यांनी पायी चालत घोषणाबाजी केली आहे. कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे. कोण म्हणत देत नाही घेतल्याशिवाय राहणार नाही अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे. त्यामुळे आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या व्यवहारावर मोठा परिणाम दिसून आला आहे.

चरायला गेलेल्या जनावरांचे घरी बसून शेतकरी जाणून घेऊ शकतात स्थान; आयडीएमसीचे हे नवीन तंत्रज्ञान विकसीत

English Summary: Nashik: Onion prices fell, Lasalgaon market committee closed the onion auction!
Published on: 27 February 2023, 10:52 IST