News

राज्यात कोरोना पुन्हा एकदा नव्याने पाय पसरू लागला आहे, कोरोनाचा नवा वेरिएंट ओमिक्रोन (Coronas new variant Omicron) हा राज्यात वेगाने पसरू लागला आहे हा ओमीक्रोन कोरोनापेक्षा कितीतरी अधिक पटीने वेगात पसरतो. नाशिक जिल्ह्यात कोरोनामुळे भयावह परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोनाचे सावट अजूनच गडद होत चालले आहे. याच पार्श्वभूमीवर शासन दरबारी अनेक उपाययोजना आखल्या जात आहेत. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय छगन भुजबळ साहेब (Hon'ble Chhagan Bhujbal Saheb, Guardian Minister of Nashik District) जिल्ह्यातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, आणि पालकमंत्र्यांनी नुकतीच एक मोठी घोषणा देखील केली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, येत्या सोमवारी पासून जिल्ह्यातील सर्व शाळा पुन्हा एकदा बंद करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे यासंदर्भात जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनीअधिकृत रीत्या वक्तव्य दिले असल्याचे समोर येत आहे.

Updated on 07 January, 2022 10:08 AM IST

राज्यात कोरोना पुन्हा एकदा नव्याने पाय पसरू लागला आहे, कोरोनाचा नवा वेरिएंट ओमिक्रोन (Coronas new variant Omicron) हा राज्यात वेगाने पसरू लागला आहे हा ओमीक्रोन कोरोनापेक्षा कितीतरी अधिक पटीने वेगात पसरतो. नाशिक जिल्ह्यात कोरोनामुळे भयावह परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोनाचे सावट अजूनच गडद होत चालले आहे. याच पार्श्वभूमीवर शासन दरबारी अनेक उपाययोजना आखल्या जात आहेत. 

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय छगन भुजबळ साहेब (Hon'ble Chhagan Bhujbal Saheb, Guardian Minister of Nashik District) जिल्ह्यातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, आणि पालकमंत्र्यांनी नुकतीच एक मोठी घोषणा देखील केली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, येत्या सोमवारी पासून जिल्ह्यातील सर्व शाळा पुन्हा एकदा बंद करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे यासंदर्भात जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनीअधिकृत रीत्या वक्तव्य दिले असल्याचे समोर येत आहे.

कोण कोणत्या शाळा राहणार बंद

कोरोनाची तिसरी संभाव्य लाट लक्षात घेता, शासन दरबारी अनेक योजना आखल्या जात आहेत. नाशिक जिल्ह्यासाठी तर उपाययोजना तयार झाल्या आहेत, जिल्ह्यात कोरोणाचा वाढता आलेख लक्षात घेता जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ साहेब यांनी सोमवारपासून सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला (Decided to close all schools from Monday In Nashik) मात्र असे असले तरी दहावी आणि बारावीचे वर्ग नेहमीप्रमाणे सुरू राहणार असे देखील सांगण्यात आले आहे. दहावी बारावीचे वर्ग वगळता बाकी सर्व वर्ग 31 जानेवारीपर्यंत पूर्णतः बंद करण्यात आले आहेत मात्र यादरम्यान ऑनलाइन तासिका घेतल्या जाऊ शकतात.

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील नागरिकांना लसीकरणात सक्रिय सहभाग नोंदवून घेण्याचा आवाहन केले आहे, तसेच जिल्हा प्रशासनाला या संदर्भात ठोस उपाय योजना करण्याचे निर्देश यावेळी माननीय साहेबांनी दिले आहेत. तसेच त्यांनी नागरिकांना सजग करताना सांगितले की या नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला असेल त्यांनी लवकरात लवकर दुसरा डोस घ्यावा तसेच जर लसीकरणाला कोणी व्यक्ती टाळाटाळ करत असेल तर शासन 'नो वॅक्सीन नो रेशन' हा नियम लागू करायला मागेपुढे बघणार नाही.

English Summary: nashik districts school were closed from monday due to covid19
Published on: 07 January 2022, 10:08 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)