1. बातम्या

या जिल्ह्याला मिळाले मे मधील अवकाळी पावसाचे नुकसानभरपाई पोटी 1.83 कोटी

मागच्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.आता रब्बी हंगामाची सुरुवात जोमात असताना देखील या अवकाळी चा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.त्यामुळे पिकांच्या नुकसानीचे सत्र सुरूच आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
crop damage

crop damage

मागच्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.आता रब्बी हंगामाची सुरुवात जोमात असताना देखील या अवकाळी चा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.त्यामुळे पिकांच्या नुकसानीचे सत्र सुरूच आहे.

मागच्या वर्षी 28 ते 30 मे 2021 या कालावधीत गारपीट व अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यातील सटाणा,मालेगाव, येवला आणि निफाड या चार तालुक्यांमध्ये  पिकांचे नुकसान झाले होते. या झालेल्या नुकसान भरपाईपोटी झालेल्या मंजूर निधी पैकी एक कोटी 83 लाख 42 हजार 135 रुपये वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही रक्कम लवकरात लवकर ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील शेता पिकांचे  अवकाळी ने मोठे नुकसान झाले आहे. हिवाळा चालू आहे तरीसुद्धा अवकाळी पावसाला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत अडचणीत आलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना  सरकारकडून आपत्ती प्रतिसाद निधीतून मदत केली जाते.मागच्या वर्षी जिल्ह्यातीलबऱ्याच भागात28, 29 आणि 30 मे रोजी गारपीट अवकाळी ने मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. या अवकाळी चा फटका जिल्ह्यातील जवळजवळ एक हजार हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्रातील शेती पिकांना बसला होता. 

यामध्ये मालेगाव तालुक्यातील 359.88,  सटाणा मधील 673.62,निफाड 1.40 व येवला तालुक्यातील 5.70हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. यामध्ये नुकसान झालेले शेतापीक व फळपिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून एक कोटी 84 लाख 38 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.हा निधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

English Summary: nashik district farmer get 1 crore 83 lakh compansation package for calamyti in unsesonal rain Published on: 21 January 2022, 10:43 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters