News

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून एक घटना समोर आली आहे. एका शेतकरी कुटुंबाने बिबट्याच्या बछड्यासोबत आठवडा काढला आहे. घरच्यांनी त्याला मांजरीचे पिल्लू मानले आणि घरी ठेवले.

Updated on 13 May, 2022 1:50 PM IST

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून एक घटना समोर आली आहे. एका शेतकरी कुटुंबाने बिबट्याच्या बछड्यासोबत आठवडा काढला आहे. घरच्यांनी त्याला मांजरीचे पिल्लू मानले आणि घरी ठेवले. मोरझर शिवार रावसाहेब गंगाराम ठाकरे यांचे मालेगाव तालुक्यात शेत असून तेथे घरही आहे. आठवडाभरापूर्वी फार्म हाऊसजवळ खेळत असताना घरातील मुलांना मांजरीच्या पिल्लासारखी दिसणारी पिल्ले दिसली.

मांजराचा रंग आणि गोंडसपणा पाहून मुलं त्याच्याशी खेळू लागली. मात्र, ते मांजरीचे पिल्लू नसून बिबट्याचे बछडे असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले आणि त्यांना घाम फुटला. या बिबट्याची आई (बिबट्याची मादी) परत न आल्याने अखेर या बछड्याला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. यावेळी मात्र शेतकरी कुटुंब गहिवरून आले होते. या पिलाला शेतकरी कुटुंबाने घरातील सदस्याप्रमाणे सांभाळले. त्याला दररोज दीड लिटर दूध दिले जात होते.

इतकंच नाही तर त्याची आई त्याला घेऊन जाईल त्यामुळे रात्री घराबाहेर ठेवले, याचीही काळजी घेतली. मात्र रस्ता चुकलेली मादी बछड्याला घ्यायला परत आली नाही. मालेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव हिरे यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाकडे मादी आणि तिचे बछडे दिसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येत आहेत.

कृष्णराव रावसाहेब ठाकरे यांनी आपल्या शेतात पाच ते सात दिवसात एक बछडा वावरत असल्याची माहिती वनविभागाला दिली. तिथे गेल्यावर एक बछडा त्याच्या कुटुंबापासून भरकटत मानवी वस्तीकडे भटकताना दिसला. " कृष्णराव ठाकरे यांच्या घराभोवती बछडा फिरताना दिसला. त्यानंतर घरातील त्यासोबत खेळताना दिसून असल्याचे समोर आले. तो बछडाही त्या मानवी वस्तीपासून दूर जायला तयार नव्हता. मात्र, वन्य श्वापद मानवी वस्तीसाठी धोकादायक असल्याने त्याला पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले.

महत्वाच्या बातम्या
ऐकावे ते नवलंच! एकाच झाडाला लागणार टोमॅटो आणि बटाटे; वाचा या नवीन टेक्निकविषयी

English Summary: Nashik: Chimurdi brought the leopard calf home as a cat and then ...
Published on: 13 May 2022, 01:50 IST