भारत आणि चीनमध्ये जेव्हा गलवान खोऱ्यात चकमक झाली त्यावेळी भारताचे २० जवान शहीद झाले त्यामुळे केंद्र सरकारने चीन च्या विविध अॅप्सवर बंधी आणली कमीत कमी १०० अॅप्स भारताने बंद केल्या. याचा डायरेकट परिणाम एका फळावर सुद्धा झाला जसे की चीनमधील ड्रॅगन या प्राण्यांचे नाव एका फळाला देत ड्रॅगन फळ असे नाव पडले.
गुजरातमधील अनेक शेतकरी या फळाची शेती करत आहेत तर याच प्रश्न महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर पडतो तर महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा यामध्ये कमी नाहीत गेल्या १९ वर्षापासून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी ड्रॅगन फळाची शेती करत आहेत.ड्रॅगन हे नाव जरी तुम्हाला चीन मधून वाटत असेल तर हे चुकीचे आहे या फळांचे मुळच दक्षिण आफ्रिका आणि मध्य आफ्रिका आहे, पण आत्ता ड्रॅगन फळाची शेती पूर्ण जगात केली जाते.
ड्रॅगन फळ या फळाला वेगवगेळ्या नावाने ओळखले जाते जसे की पिटया, स्ट्रॉबेरी पिअर. हे फळ आपली प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते, ड्रॅगन फ्रुट असे नाव या फळाला १९६३ मध्ये पडले.गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी ड्रॅगन फ्रुट च्या नावाचे नामांतर केल्याची घोषणा केल्यामुळे हे नाव चर्चित आले आहे, गुजरातमध्ये भरपूर प्रमाणात ड्रॅगन फ्रुट ची शेती केली जाते. गुजरातमधील शेतकरी २०१४ ते २०१५ पासून या फळाची शेती करत आहेत. तर महाराष्ट्र राज्यातील शेतकरी २०१२ पासून ड्रॅगन फ्रुट ची शेती करत आहेत त्यामध्ये सांगली, पुणे, बीड, अहमदनगर आणि सोलापूर जिल्हे अग्रेसर आहेत.
महाराष्ट्रात मुंबई, पुणे, बंगलोर आणि हैद्राबाद मध्ये या फळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे, एकदा लागवड केल्यानंतर हे पीक २० ते २५ वर्ष टिकते पण यासाठी तुम्हाला वेळोवेळी त्याची निगा राखावी लागते. महाराष्ट्र मधील शेकरी रेड आणि व्हाईट कलर च्या ड्रॅगन फ्रुट ची शेती करतात.
Published on: 29 June 2021, 02:53 IST