News

नाम फाउंडेशन राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसाठी नेहमी सजग राहिले आहे. हे संस्थान सामाजिक उपक्रम राबवित शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अहोरात्र झटत आहे. या फाउंडेशन अंतर्गत विशेषता मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात उपक्रम राबविले जातात. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती बघता नाम फाउंडेशन ने या भागात जलसंधारण योजना कार्यान्वित केली आहे. एवढेच नाही नाम फाउंडेशन आता याच्या पुढे एक पाऊल टाकत गेल्या वर्षभरात नांदेड जिल्ह्यातील जेवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी पुढे सरसावले आहे.

Updated on 09 March, 2022 6:15 PM IST

नाम फाउंडेशन अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना पंचवीस हजार रुपये आर्थिक मदत म्हणून दिली जातं आहे. शेतकरी कुटुंबातील कुटुंबप्रमुख जेव्हा आत्महत्या करतो, तेव्हा अशा कुटुंबावर मोठी भयान आपदा येत असते. यातून अशा कुटुंबांना बाहेर काढण्यासाठी तसेच त्यांना छोटा-मोठा व्यवसाय किंवा कठीण प्रसंगी पैशांची मदत व्हावी या हेतूने नाम फाउंडेशन अंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली जात आहे. नुकतेच बुधवारी नाम फाउंडेशनच्या वतीने संबंधित आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ही मदत जारी करण्यात आली.

घरचा कुटुंब प्रमुख अथवा कर्ता पुरुष निघून गेल्यावर त्या घराची काय दशा होते याची आपण देखील कल्पना करू शकतो. दिवसेंदिवस वाढती महागाई आणि कुटुंब प्रमुख हयात नसताना जीवनयापण करणे मोठे हालाकीचे असते. त्यासाठी नाम फाउंडेशनने हा उपक्रम हाती घेतला आहे जेणेकरून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना एक नवीन सुरुवात करता येईल. वेळप्रसंगी या पैशांचा वापर करून कठीण प्रसंग दूर करण्यास मदत होईल.

नांदेड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात जवळपास सव्वाशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. नाम फाउंडेशन शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी कायम प्रयत्न करत राहिले आहे. नाम फाउंडेशन अंतर्गत जलसंधारण प्रकल्प कार्यान्वित केले जातात, जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची कुठलीच टंचाई भासू नये हा त्यामागचा उद्देश. मात्र असे असूनही जे शेतकरी आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय घेतात त्यासाठी देखील नाम फाउंडेशन पुढे सरसावले आहे आणि अशा शेतकरी कुटुंबियांना 25 हजार रुपयांची रक्कम आर्थिक मदत म्हणून सुपूर्द केली जाणार आहे.  जिल्ह्यातील 121 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ही मदत दिली जाणार आहे बुधवारी या मदतीचे वाटप देखील सुरू झाले आहे.

English Summary: nam foundation giving 25000 to farmers
Published on: 09 March 2022, 06:15 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)