हिंवाळा सुरू होण्यापूर्वी बाजारात नारंगी येण्यास सुरू होते. नागपूरची संत्री(oranges) आता फक्त देशातच न्हवे तर परदेशात सुद्धा चवीने खालली जात आहे.अपेडा आणि भारतीय कृषी संशोधन परिषद केंद्रीय संस्था नागपूर या दोघांमध्ये करार झाला असून मोसंबी आणि नागपूरची संत्री चा निर्यात मार्ग मोकळा करण्यात आला.नागपूरची संत्री चवीला दर्जदार मानली जाते मात्र निर्यातीसाठी तंत्रज्ञान विकास व प्रसाराची गरज लागते. संत्री आणि मोसंबी चा निर्यात मार्ग मोकळा झालेला आहे. भौगोलिक स्थिती चांगली असल्याने संत्राचे उत्पादन चांगल्या प्रकारे भेटते. सध्या अपेडा आणि भारतीय कृषी संशोधन परिषद केंद्रीय संशोधन संस्था नागपूर मध्ये करार झाल्यामुळे या दोन्ही फळांच्या निर्यातीचा मार्ग मोकळा झालेला आहे.
कोणत्या बाबी आवश्यक आहेत ?
फळांच्या बाबतीमध्ये तुम्हाला योग्य मार्गदर्शन घेणे खूप आवश्यक आहे तसेच फळाची निर्यात वाढवायची असेल तर संशोधन व तंत्रज्ञान वाढवावे लागेल. फळ तोडणी आधी तसेच फळ तोडणी नंतर चे योग्य व्यवस्थापन केले पाहिजे. फळ टिकवण्याचा काळ किती आणि कसा असावा तसेच लक्ष केंद्रित केले तर मार्केट कधी वाढेल यावरती सुद्धा लक्ष दिले पाहिजे. संत्री चे उत्पादन तर चांगल्या प्रकारे निघतेच मात्र फळ सुधारित करायचे असेल तर तंत्रज्ञानाची आवश्यकता भासते.
कीड व रोग नियंत्रणासाठी विशेष कार्यक्रम:
संत्रीच्या फळाबरोबर त्याचा दर्जा सुद्धा खूप महत्त्वाचा असतो. संत्रा उत्पादक जी जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये ज्या शेतकरी उत्पादक संस्था तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत त्या स्थानिक पातळीवर विस्तार कार्यक्रम राबवला जाणार आहे. या कार्यक्रमात सेंद्रिय संत्रा तसेच मोसंबी उत्पादनाला प्रोत्साहन दिले जाणार आहे. कीड नियंत्रण व रोग नियंत्रणसाठी सुद्धा विशेष कार्यक्रम राबवला जाणार आहे.
करारामधील वैशिष्टे:
१. आयसीआर आणि सीसीआरआय या दोन्ही संस्थांमध्ये करार झाला असून सध्या जागतिक बाजारात ही दोन्ही फळे जोडली जातील आणि उत्पादनास सुद्धा मदत होईल.
२. "ब्रँड इंडिया" जागतिक पातळीवर स्थापन करून फळांचा दर्जा वाढवला जाणार आहे.
३. बाजारामध्ये या दोन्ही फळांचा विस्तार व विकास करून ब्रँडिंग, पॅकिंग करून निर्यातीला प्रोत्साहन दिले जाणार आहे.
४. देशांच्या गरजेनुसार माल पोहचवणे ही या कराराची वैशिष्ट्य आहेत.
Published on: 23 October 2021, 12:15 IST