News

कांदा शेतकऱ्यांच्या मदतीला केंद्र सरकार धावून आले आहे. कांदाचे वाढलेले उत्पन्न आणि घटत असलेला दर पाहून सरकार पुढे आले आहे. स्वदेशी बाजारात नाफेडला कांदा खरेदीसाठी पुढे करण्यात आले आहे. सहकारी एन्जसी नाफेडने चालू हंगामात १ लाख टन कांद्याचा बंफर स्टॉक बनविण्याचा निर्णय घेतला आहे. जो आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा साठा असणार असल्याचे सांगितले जात आहे.

Updated on 15 June, 2020 5:29 PM IST


कांदा शेतकऱ्यांच्या मदतीला केंद्र सरकार धावून आले आहे.  कांदाचे वाढलेले उत्पन्न आणि घटत असलेला दर पाहून सरकार पुढे आले आहे.  स्वदेशी बाजारात नाफेडला कांदा खरेदीसाठी पुढे करण्यात आले आहे.  सहकारी एन्जसी नाफेडने चालू हंगामात १ लाख टन कांद्याचा बंफर स्टॉक बनविण्याचा निर्णय घेतला आहे.  जो आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा साठा असणार असल्याचे सांगितले जात आहे.  दरम्यान मोठ्या जलद गतीने नाफेडने आतापर्यंत २५ हजार टन कांद्याची साठवूण केली आहे.  फार्मर्स प्रोड्यूसर ऑर्गनाइजेशन',  या सरकारी संस्था आणि मंडईमध्ये स्थापिक खरेदी केंद्रातून एजन्सी कांद्याची सरकारी खरेदी करत आहे.

मागील वर्षाच्या रब्बी हंगामात नाफेडने ५७ हजार टन कांदा खरेदी केली होता. परंतु यावेळी खरेदीचे लक्ष्य हे दुप्पट करण्यात आले असून ते १ लाख टन केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे. तर उपभोक्तांना म्हणजेच ग्राहकांना हंगाम नसतानाही कांदाचा पुरवठा केला जाणार आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या एफपीओ, सहकारी संस्थांच्या माध्यमातून आतापर्यंत २५ हजार टन कांदा खरेदी करण्यात आला आहे. देशातील विविध बाजारात कांदाचा दर हा १० ते १४ रुपये प्रतिकिलो चालू आहे.  तर मोठ्या शहरात कांद्याचा दर हा  २० ते ३० रुपये किलो आहे.  मागील वर्षाच्या तुलनेने या वर्षी कांदा उत्पादनात वाढ झाली आहे.  मागील वर्षी २.२८ कोटी टन कांदा उत्पादित करण्यात आला होता तर यावर्षी २०१९-२० मध्ये २.६७ कोटी टन इतके उत्पादन कांद्याचे झाले आहे.  यामुळे पुर्ण वर्षभर कांद्याचा दर हा नियंत्रणात राहू शकणार आहे.  परंतु दर घसरू लागल्यामुळे सरकारने आपल्या संस्थांना खरेदीसाठी मैदानात उतरवले आहे.  दरम्यान साठा व्यवस्थित राहावा यासाठी तांत्रिक पद्धतीचा वापर केला जात आहे.

English Summary: nafed come forward to help onion producer farmer
Published on: 15 June 2020, 05:29 IST