News

NABARD Recruitment 2020: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) मध्ये विविध विभागात स्पेशलिस्ट कंसल्टेंटच्या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेची सुचना प्रसारित करण्यात आली आहे.

Updated on 08 August, 2020 1:44 PM IST


NABARD Recruitment 2020: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) मध्ये विविध विभागात स्पेशलिस्ट कंसल्टेंटच्या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेची सुचना प्रसारित करण्यात आली आहे.  दरम्यान या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया शनिवारपासून सुरू झाली आहे. या पदासांठी इच्छुक आणि योग्य उमेदवार नाबार्डच्या अधिकृत nabard.org या संकेतस्थळावर जाऊन येथे देण्यात आलेले अप्लिकेशन अर्ज भरु शकता. यासह या लेखात आम्ही लिंक देत आहोत त्यावरुन क्लिक करुन अर्ज डाऊनलोड करु शकतात.  आणि ऑनलाईन अप्लिकेशन अर्जाच्या पेजवरही तुम्ही जाऊ शकतात. ऑनलाईन अर्जासाठी अंतिम तारीख २३ ऑगस्ट २०२० असून या तारेखपर्यंत शुल्क द्यावे लागणार आहे.

नाबार्ड स्पेशलिस्ट कंसल्टेट भर्ती - २०२० नोटिफिकेशन

https://www.nabard.org/auth/writereaddata/CareerNotices/0708204951Specialist%20Consultants%20-%20Advertisement%20-%202020.pdf

नाबार्ड स्पेशलिस्ट कंसल्टेट भर्ती २०२० ऑनलाईन अप्लिकेशन फार्म https://ibpsonline.ibps.in/nabrsccaug20/

पदांविषयीचा तपशील -

  • प्रोजेक्ट मॅनेजर - १ पद

वेतन - ३ लाख रुपये दरमहा

  • सीनिअर एनालिस्ट - इंफॉर्मेशन सिक्युरिटी ऑपरेशन्स

पद - १

वेतन २.५ लाख रुपये दरमहा

  • वरिष्ठ एनालिस्ट - नेटवर्क /एसडीडब्ल्यूएएन ऑपरेशन्स

पद - १

वेतन  - २.५ लाख रुपये दरमहा

  • प्रोजेक्ट मॅनेजर- आयटी ऑपरेशंस /इंफ्रास्ट्रक्चर सर्विसेस

पद - १

वेतन - २.५ लाख रुपये दरमहा

एनालिस्ट - कम - चीफ डाटा कंसल्टेंट

पद - १

वेतन - ३.७५ लाख रुपये दरमाह

  • सायबर सिक्युरिटी मॅनेजर - (सीएसएम)

पद - १

वेतन - ३.७५ लाख रुपये दरमहा

  • एडिशनल  सायबर सिक्युरिटी  मॅनेजर (एसीएसएम)

पद - १

वेतन - २.५ लाख रुपये दरमाह

एडिशनल चीफ रिस्क मॅनेजर -

पद - २

वेतन - ३ लाख रुपये दरमहा

  • रिस्क मॅनेजर  - (क्रेडिट रिस्क, मार्केट रिस्क, ऑपरेशनल रिस्क, कंप्लायंस रिस्क, ईआरएमएस एवं बीसीपी) –

पद -४

वेतन - २.५ लाख रुपये दरमहा

सुविधा

निवास सुविधा

नाबार्डमध्ये स्पेशलिस्ट कंसल्टेंटच्या पदावर नियुक्त उमेदवारांना घाटकोपर किंवा कांदीवली येथील नाबार्ड वसाहतीत आवास देण्यात येईल. जर जागा उपलब्ध न झाल्यास त्यांना पदानुसार निर्धारित हाऊस रेंट म्हणजेच घर भाडे((एचआरए) देण्यात येईल.
अधिक माहितीसाठी अधिकृत नोटिफिकेशन पाहावे.

English Summary: NABARD Recruitment 2020: Recruitment for Specialist Consultant in NABARD, application process started
Published on: 08 August 2020, 01:43 IST