शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी केंद्र शासनाने विविध प्रकारच्या योजना आणले आहेत.काही योजना या केंद्र सरकारच्या तर काही योजना या राज्य सरकारचे आहेत.
अशा बऱ्याच प्रकारच्या योजनांमध्ये अनुदानाच्या स्वरूपात शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. कृषी क्षेत्राच्या विकासामध्ये नाबार्डचे अतिशय महत्त्वपूर्ण योगदान आहे.नाबार्डच्या वतीने येणाऱ्या वित्तीय वर्षासाठी पतपुरवठा आराखडा तयार केला असून यामध्ये जवळ-जवळ कृषी क्षेत्रासाठी 1 लाख 43 हजार एकोणीस कोटींची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे. कृषी क्षेत्रासाठी कोणत्या प्रकारचे धोरण राहणार याचा अभ्यास करून त्या अनुषंगाने हा पतपुरवठा तयार केला जातो. जर नाबार्डने कृषी व अन्न प्रक्रिया संचालनालय अंतर्गत येणाऱ्या योजनांचा समावेश जर त्यांच्या पतपुरवठा मध्ये केला तर शेतकऱ्यांना त्यांचा खूप फायदा होणार आहे.
यासाठी नाबार्डने येणाऱ्या वित्तीय वर्षासाठी चा प्रस्ताव राज्य सरकार समोर सादर केला आहे.या संबंधित विषयाची झालेल्या बैठकीत राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनीही काही सूचना केल्या असून यंदाचे वर्ष आहे महिला शेतकरी सन्मान वर्ष म्हणून साजरी केली जाणार असल्यानेत्या अनुषंगाने महिला बचत गटांना कर्जपुरवठा करण्याची मागणीदेखील भुसे यांनी केली आहे.
नाबार्डच्या या निधीचा शेतकऱ्यांना थेट कसा लाभ होईल याबाबत कृषी विभागाने आणि नाबार्डने धोरण ठरवावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी झालेल्या बैठकी दरम्यान दिले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आवश्यक धोरणे उचलून राज्य शासनासोबत त्यांची अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
Published on: 23 February 2022, 04:00 IST