News

सध्या शासनाने दुधाचा ३४ रुपये दर निश्चित केला असला तरी त्याचा फायदा कमी, उलट तोटा होतो आहे. कारण यापूर्वी 40 रुपयांपर्यंत दर मिळायचा. आता मात्र परिस्थिती खूपच बदलली आहे.

Updated on 10 August, 2023 10:00 AM IST

सध्या शासनाने दुधाचा ३४ रुपये दर निश्चित केला असला तरी त्याचा फायदा कमी, उलट तोटा होतो आहे. कारण यापूर्वी 40 रुपयांपर्यंत दर मिळायचा. आता मात्र परिस्थिती खूपच बदलली आहे.

दर निश्चित केल्यामुळे डेअरी चालकांनी आता तोच दर देणे सुरू केले आहे. सकाळ-संध्याकाळ मिळून ९० लिटरचा पुरवठा डेअरीला करतो. त्यामुळे प्रति लिटर तीन रुपयांप्रमाणे दररोजचे नुकसान होत आहे. दुसरीकडे पशुखाद्याचे दरही वाढत असल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे, असे शेतकरी सांगत आहेत.

शासनाने ३४ रुपये दर निश्‍चित केल्याचे एकीकडे स्वागत असले, तरी दुग्ध व्यावसायिकांना सरासरी ३ रुपयांचा फटका बसतो आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यामुळे शेतकरी अडचणी आले आहेत.

टोमॅटोच्या शेतात शेतकऱ्याने बसवले सीसीटीव्ही कॅमेरे, टोमॅटोची चोरी होऊ नये म्हणून लढवली शक्कल..

बुलढाणा जिल्ह्यात खासगी डेअरींकडून किमान दर ३६ ते ३७ रुपयांपर्यंत प्रतिलिटर मिळत होता. शासनाने घोषणा केल्यानंतर या खरेदीदारांनी ३४ रुपयांचा दर देणे सुरू केले. यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांनो या पद्धतींनी शेतातील भूजल पातळी सुधारू शकते, जाणून घ्या..

जिल्ह्यात दररोज वेगवेगळ्या डेअरींकडून हजारो लिटर दुधाची खरेदी केली जाते. विविध डेअरींनी स्थानिक भागात संकलन केंद्र उघडले असून, त्या माध्यमातून खरेदी सुरू आहे. जिल्हा संघ डबघाईस आल्यापासून जिल्ह्यातील पशुपालकांना खासगी डेअरींचा आधार अधिक आहे.

इथल्या दूधाला भाव देत नाही अन् बाहेरुन आयात का करता ? सुप्रिया सुळेंचा मोदी सरकारवर बरसल्या...

English Summary: Mybap government is getting hit by Rs 3 per litre, milk producers demand to reduce animal feed prices
Published on: 10 August 2023, 10:00 IST