News

शेती आणि शेतकरी हे दोन्ही घटक गेली ६० वर्षे राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. परंतु ना शेतकरी श्रीमंत झाले ना त्यांची चिंता कमी झाली. याचे मूळ कारण सातत्याने शेतकऱ्याला जास्तीत जास्त उत्पन्न वाढीचेच धडे शिकवले जातात मात्र शेतमाल विकायचा कसा,कुठे, कधी हे सूत्र शेतकऱ्याला समजून सांगितले जात नाही आणि त्यामुळे ते सांगण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

Updated on 08 May, 2021 1:39 PM IST

शेती आणि शेतकरी हे दोन्ही घटक गेली ६० वर्षे राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. परंतु ना शेतकरी श्रीमंत झाले ना त्यांची चिंता कमी झाली. याचे मूळ कारण सातत्याने शेतकऱ्याला जास्तीत जास्त उत्पन्न वाढीचेच धडे शिकवले जातात मात्र शेतमाल विकायचा कसा,कुठे, कधी हे सूत्र शेतकऱ्याला समजून सांगितले जात नाही आणि त्यामुळे ते सांगण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

शेतकरीसुद्धा श्रीमंत झाला पाहिजे याकडे सध्या कुणीच लक्ष द्यायला तयार नाही. आणि शेत सुद्धा विकण्याचे सूत्र जाणून घेतले पाहिजे तेव्हाच शेती या व्यावसायात गोडी निर्माण होईल.पिकवणाऱ्यापेक्षा विकणाराच श्रीमंत होतो आहे याचे कारण व्यापारी वर्गाला विकण्याबद्दलचे सर्व ज्ञान असते. वास्तविक पाहता शेतकऱ्याचे कष्ट हे सर्वात मोठे आहे तरीही सुद्धा शेतकरी वर्ग नेहमी आर्थिक अडचणीत भासत आहे. त्याच्या संसाराचा गाडा चालवत असतांना पेश्याच्या बाबतीत (याची टोपी त्याला अन त्याची टोपी याला) म्हणजे उसनवारी हेच चालू आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल कुठे,कसा,कधी आणि कोणाला विकायचा हे तंत्र जाणून घेतले पाहिजे त्याचबरोबर प्रक्रिया उद्योगाला सुद्धा वळायला हवं.

 

म्हणजे आपला माल स्वस्त दरात विकल्या जातो आणि तो एका पॅकेट मध्ये पॅक झाला की त्याचा भाव दुप्पट होतो आणि त्यामुळे याचा कुठेतरी अभ्यास करून आपल्या शेतातला माल आपल्या घरातच त्यावर प्रक्रिया होऊन त्याचा भाव आपण दुप्पटकरू शकतो. जसे की शेतकऱ्याच्या उसाला भाव दोन हजार रुपये टन आणि त्याच उसाच्या एका कांड्यांचे चार तुकडे केले आणि त्याला चकचकीत कापडामध्ये पॅक केलं कि त्याची किंमत वाढते. त्याचबरोबर मुगी नावाचं हे ध्यान्य आता आपल्या जास्त परिचयाचे नाही.

 

परंतु याचा उपयोग रात्री ग्लासात रात्रभर भिजू घालून सकाळी ते पाणी पिल्याने एसिडिटी,पोटदुखी यासारखे आजार होत नाही आणि तेच औषध म्हणून मुंबई पुणे सारख्या शहरामध्ये आयुर्वेदिक औषधे म्हणून विकू लागले आणि त्याच एका ग्लास ची किंमत १७० रुपये आहे. आणि त्या धान्याची किंमत १५० रुपये किलो. किती आपण समजू शकतो की प्रक्रिया केल्यास त्या मालाला किती भाव मिळू शकतो. त्यामुळे शेतकरी वर्गाला हे विकण्याचे आणि मालावर प्रक्रिया हे तंत्र समजून घ्यावे लागेल तेव्हाच शेतकरी लवकर श्रीमंत होऊ शकतो....

गोपाल उगले
कृषी महाविद्यालय अकोला
मो - 9503537577

English Summary: My opinion - 'The seller is richer than the seller'
Published on: 08 May 2021, 01:39 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)