News

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला

Updated on 09 September, 2022 8:52 PM IST

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील मृदे विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागातील सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य प्रकल्प अंतर्गत अकोला जिल्ह्यातील वारी हनुमान येथील एकूण 22 कपाशी उत्पादक आदिवासी शेतकरी तसेच चार सोयाबीन उत्पादक आदिवासी शेतकरी यांना प्रथम रेषीय प्रात्यक्षिक अंतर्गत द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त पीडीकेवी ग्रेड 11 व पीडीकेवी ग्रेड दहा या खताचे वाटप व त्यांच्या वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले

डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ चे संशोधन संचालक डॉक्टर विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख 

हे ही वाचा - एकात्मिक पद्धतीने संत्रा फळगळ प्रतिबंध करा - कुलगुरू डॉ. विलास भाले

डॉक्टर संजय भोयर यांनी महाराष्ट्र शासनाचा उपक्रम माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी अंतर्गत वारी हनुमान येथे कापूस व सोयाबीन उत्पादक आदिवासी शेतकऱ्यांकरिता सदर एकदिवशीय शेती दिन तथा प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला Organized one-day agriculture day and training programयावेळी विद्यापीठाचे मिरची व भाजीपाला संशोधन

केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर श्याम घावडे यांनी परसबागेच्या उपयुक्त ते बाबत उपस्थित शेतकरी बंधू व भगिनींना माहिती दिली व परसबागेत भाजीपाला लागवड केल्याने खर्चात बचत होऊन उत्पन्नात कशी वाढ होते याबाबत मार्गदर्शन केले सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य योजनेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर संदीप हाडोळे यांनी कृषी विद्यापीठ निर्मित द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त पी डी के व्ही मायक्रो ग्रेड दोन दहा तसेच अकरा या खतांबाबत तसेच त्यांच्या

विविध पिकावरील वापराबाबत सखोल मार्गदर्शन केले.याप्रसंगी सर्वच्या सर्व 26 शेतकऱ्यांचे मातीचे नमुने गोळ्या करण्यात आले असून त्यांचे पृथक्करण करून सर्वांना मृदा आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात येणार आहे कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सूक्ष्म अन्नद्रव्य योजनेचे कनिष्ठ मृदा शास्त्रज्ञ श्री प्रशांत सरप यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता वारी हनुमान येथील आदिवासी बंधू श्री प्रेमलाल बिलावेकर श्री नंदू तोटे तसेच सरपंच श्री शिवाजी पतंगे यांनी परिश्रम घेतले

English Summary: My One Day for My Baliraja Guidance to Tribal Farmers on Use of Micronutrient Liquid Fertilizers, Backyard
Published on: 09 September 2022, 06:05 IST