News

देशात खाद्यतेलाचे दर खूप वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. मात्र महागाईच्या आघाडीवर आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे. तेलबियांच्या उत्पादनात वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः मोहरीच्या उत्पादनात भरघोस २९ टक्के वाढ झाली आहे.

Updated on 08 September, 2022 9:59 AM IST

देशात खाद्यतेलाचे दर (Edible oil rates) खूप वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. मात्र महागाईच्या (inflation) आघाडीवर आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे. तेलबियांच्या (Oilseeds) उत्पादनात वाढ (Increase in production) झाल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः मोहरीच्या (Mustard) उत्पादनात भरघोस २९ टक्के वाढ झाली आहे.

देशात तेलबियांचे उत्पादन हळूहळू वाढत आहे. विशेषतः मोहरी. या मागचे एक मोठे कारण म्हणजे चांगली किंमत. गेल्या दोन वर्षांपासून मोहरीचा बाजारभाव किमान आधारभूत किमतीपेक्षा (MSP) अधिक मिळत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी गहू व इतर रब्बी पिकांऐवजी याकडे लक्ष देत आहेत.

त्याचाच परिणाम म्हणजे गेल्या दोन वर्षांत मोहरीचे उत्पादन 29 टक्क्यांनी वाढून 91.24 वरून 117.46 लाख टन झाले आहे. रब्बी हंगामावर आयोजित कृषी परिषदेत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर (Agriculture Minister Narendra Singh Tomar) यांनी मोहरीचे उत्पादन वाढविण्याबाबत सांगितले.

पावसाची उघडीप! खरीप हंगामातील पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

मोहरीच्या उत्पादकतेत १० टक्के वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. त्याचे उत्पादन 1331 किलो प्रति हेक्‍टरवरून 1458 किलो प्रति हेक्‍टर इतके वाढले आहे. रेपसीड आणि मोहरीचे क्षेत्र 2019-20 मध्ये 68.56 वरून 2021-22 मध्ये 80.58 लाख हेक्टरवर 17 टक्क्यांनी वाढले आहे.

सोयाबीन आणि सूर्यफूल मिशन

तोमर म्हणाले की, मोहरीचे वाढलेले उत्पादन पामतेल आणि सूर्यफूल तेलाची आयात कमी करण्यास मदत करेल. सरकार आता मोहरी मिशनच्या धर्तीवर सोयाबीन आणि सूर्यफूल मिशनही राबवत आहे. जेणेकरून त्याचे उत्पादन जलद गतीने वाढेल आणि भारत लवकरात लवकर तेलबियांमध्ये स्वयंपूर्ण होईल. भारत आपल्या खाद्यतेलाच्या 65 टक्के गरजेची आयात करतो.

Tata Motors: टाटा मोटर्स सीएनजी कारसह अनेक गाड्यांवर देत आहे बंपर सूट; जाणून घ्या सविस्तर

खाद्यतेल : इतर देशांचे अवलंबित्व कधी संपणार?

भारत दरवर्षी सुमारे ७०,००० कोटी रुपयांचे खाद्यतेल आयात करतो. कारण आपल्या देशात तेलबिया पिकांचे उत्पादन खूपच कमी आहे. सर्वाधिक पामतेल आयात करतो. हे तेल आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. एकूणच खाद्यतेलासाठी आपण इंडोनेशिया, मलेशिया आणि रशियावर अवलंबून आहोत. भारतात खाद्यतेलाच्या कमतरतेमुळे गेल्या वर्षभरात त्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे.

महत्वाच्या बातम्या:
कच्चा तेलाच्या किमती घसरल्या! पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काय झाला बदल? जाणून घ्या शहरातील नवे दर...
संकटांची मालिका संपेना! शेतकऱ्यांची चिंता वाढली, सोयाबीनवर लष्करी अळीचा हल्ला

English Summary: mustard production increased by 29 percent, now prices will be reduced
Published on: 08 September 2022, 09:59 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)