News

हिरवा चारा हा गुराढोरांसाठी उत्तम खाद्य असतो.

Updated on 26 July, 2022 2:20 PM IST

हिरवा चारा हा गुराढोरांसाठी उत्तम खाद्य असतो. यामध्ये गुरांना पोषक अशी बहुतांश अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात असतात. परंतु आपल्या भागात उन्हाळ्यात सिंचनाची योग्य सोय नसल्याने हा हिरवा चारा उन्हाळ्यात पिकवला जाऊ शकत नाही. यामुळे शेतकरी आणि पशुपालक आपल्या गुरांचे योग्य पोषण करण्यात अपयशी ठरतात. त्यामुळे दूध उत्पादनातही घट होते.यावर उपाय म्हणून मुरघास बनवण्याचे तंत्र जर शेतकऱ्यांनी स्वीकारले आणि पावसाळ्यात किंवा हिवाळ्यातच हिरव्या चाऱ्यापासून मुरघास बनवून

गुरांना उन्हाळ्यात खाऊ घालण्यासाठी साठवून ठेवले तर उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याचा प्रश्न शेतकऱ्याला पडणार नाही आणि दुग्ध उत्पादनात वाढ होण्यास ही मदत होईल. शिवाय गुरेही हा मुरघास आवडीने खातात.अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या नव्या तंत्रज्ञानाविषयी माहित व्हावे तसेच त्यांनी मुरघास बनवण्याचे तंत्रज्ञान आत्मसात करावे या उद्देशाने श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या वतीने मुरघास कशी तयार करावी यावर एक प्रात्यक्षिक कार्यक्रम डवरगाव येथे आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रम हा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकिशोर चिखले,

शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या वतीने मुरघास कशी तयार करावी यावर एक प्रात्यक्षिक कार्यक्रम डवरगाव येथे आयोजित करण्यात आला.Demonstration program was organized at Dwargaon.सदर कार्यक्रम हा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकिशोर चिखले, कार्यक्रम अध्यक्ष प्रा. आर. के. पाटील आणि विषय तज्ञ प्रा. नंदकिशोर खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे विद्यार्थी शिवम भालतडक, वैभव मोरे, अजिंक्य राजपूत, ऋषिकेश व्यवहारे, संकेत भोंबळे, जयदिप गावंडे, हिमांशू झोडे, राहुल कापगते आणि गौरव सोनटक्के यांनी पार पाडला.

यामुळे शेतकरी आणि पशुपालक आपल्या गुरांचे योग्य पोषण करण्यात अपयशी ठरतात. त्यामुळे दूध उत्पादनातही घट होते.यावर उपाय म्हणून मुरघास बनवण्याचे तंत्र जर शेतकऱ्यांनी स्वीकारले आणि पावसाळ्यात किंवा हिवाळ्यातच हिरव्या चाऱ्यापासून मुरघास बनवून गुरांना उन्हाळ्यात खाऊ घालण्यासाठी साठवून ठेवले तर उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याचा प्रश्न शेतकऱ्याला पडणार नाही आणि दुग्ध उत्पादनात वाढ होण्यास ही मदत होईल. शिवाय गुरेही हा मुरघास आवडीने खातात.

English Summary: Murghas is a boon for the dairy industry
Published on: 26 July 2022, 02:20 IST