News

उन्हाळा असो, हिवाळा असो किंवा कितीही जोरदार पाऊस असो, दररोज दोन लाख 60 हजार मुंबईकरांना दुपारचे त्यांच्या घरचे गरमागरम जेवण अगदी वेळेत पोहचविण्यासाठी पांढराशुभ्र शर्ट, पायजमा

Updated on 17 November, 2020 4:55 PM IST

उन्हाळा असो, हिवाळा असो किंवा कितीही जोरदार पाऊस असो, दररोज दोन लाख 60 हजार मुंबईकरांना दुपारचे त्यांच्या घरचे गरमागरम जेवण अगदी वेळेत पोहचविण्यासाठी पांढराशुभ्र शर्ट, पायजमा व गांधी टोपीत वावरणारी आणि मुंबईची जीवनरेखा म्हणून ओळखली जाणारी ही माणसे क्षणाक्षणाला धावत असतात. मुंबईचे डबेवाले या नावाने जगभर प्रसिध्द असलेली ही माणसे मुंबईकरांसाठी त्यांचे घर ते ऑफिस आणि पुन्हा घर गाठत जेवणाचे डबे वेळेवर अचूक पोहचवितात. आता हे डबेवाले त्यांच्या जीवनाचे दररोजचे चक्र पुन्हा सुरु करण्यासाठी धडपडत आहेत. परंतु डब्बेवाले ज्या सायकलवर स्वार होत डबे पोहचवित, त्याच सायकल कोरोना लॉक़डाऊनच्या काळात विनावापर अनेक महिने पडून राहिल्याने एकतर त्या वापरण्याच्या स्थितीत नाही किंवा मोठ्या प्रमाणात तिच्या रिपेंरिंगची गरज तयार झालेली आहे.

सर्वसाधारण विमा क्षेत्रातील सर्वात मोठी खासगी कंपनी असा नावलौकिक असलेली आयसीआयसीआय लोम्बार्ड मुंबईच्या डबेवाल्यांचा मदतीसाठी धावून आली आहे. हजारो डबेवाल्यांना कंपनीने नव्या कोऱ्या सायकली आणि हेल्मेट पुरविले आहेत. याचबरोबर या उपक्रमांतर्गत काहींच्या सायकलही दुरुस्त करुन दिल्या आहेत. रस्ते वाहतुक सुरक्षेलाही प्राधान्य देताना कंपनीने डबेवाल्यांना मुंबईच्या रस्त्यांवर गर्दीतही सुरक्षितपणे सायकली चालविता येण्यासाठी हेल्मेटचे वाटप केले आहे. कोरोना-19 च्या महामारीत नानाविध घटकांना मदत करण्यासाठी कंपनीने सुरु केलेल्या # रिस्टार्टराईट या मोहिमेशी हे प्रयत्न अगदी मिळतेजुळते आहेत.

कंपनीच्या या उपक्रमाबद्दल बोलताना आयसीआयसीआय लोम्बार्डचे विशेष संचालक (ईडी) संजीव मंत्री म्हणाले की, निर्भय वादे या आमच्या ब्रॅण्डच्या बाण्याला अनुसरुन आयसीआयसीआय लोम्बार्ड हे त्यांच्याशी संबंधित नानाविध घटकांना त्यांच्या अडचणीच्या काळात मदतीसाठी सतत प्रयत्नशील आहेत. मुंबईत 1890 सालापासून या महान व्यवसायात निरंतर कार्यरत असणारे मुंबईचे डब्बेवाले नेहमीच्या स्थितीत दररोज दोन लाख 60 हजार मुंबईकरांना त्यांचे जेवणाचे डबे अतिशय वेळेवर पोहचवतात. डब्बेवाल्यांना मदत करण्यास आम्हाला संधी दिल्याबद्दल आम्ही मुंबई डब्बेवाला संघटनेला धन्यवाद देतो. एक जबाबदार नागरीक या नात्याने मदतशील घटक म्हणून आम्ही लक्ष केंद्रीत केलेले आहे. तसेच आमच्याशी संबंधित नानाविध घटकांना त्यांचे दररोजचे कामकाज योग्य रितीने पुन्हा सुरु करण्यासाठी हातभार लावत आहोत.

कंपनीच्या मदतीबद्दल जागृती करण्यासाठी आणि अन्य घटकांनीही मदतीसाठी पुढे येण्यासाठी आयसीआयसीआय लोम्बार्डने यावर डिजीटल फिल्मही तयार केली आहे. ह्दयाला स्पर्श करणारी या फिल्मची सुरुवातच लॉक़डाईऊनला पुन्हा मुदतवाढ दिल्याची बातमी ऐकतच एक डबेवाला आपल्या घराच्या खि़डकीतून बाहेर पाहतानाच्या विलक्षण दृश्याने होते. निराशेच्या स्थितीत घराबाहेर येत अतिशय शांतपणे उभ्या असलेल्या आपल्या सायकलकडे त्याची नजर जाते. विनावापरामुळे हळूहळू तिच्यावर गंज वाढत असतो. ही फिल्म हळूहळू पुढे सरकत असताना फिल्मच्या या नायकाला डब्ब्यांचे काम पुन्हा सुरु करण्यासाठी एक फोनक़ॉल येतो. आशेच्या या नव्या किरणामुळे तो सायकलची स्थिती तपासण्यासाठी पुढे सरकतो आणि चेनला ऑईलिंग करत असताना ती अडकते आणि तुटते. परिणामी त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा निऱाशेचे भाव उमटतात. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी सायकलच्या बेलच्या आवाजाने त्याला जाग येते आणि घराबाहेर डोकावताच त्याचाच सहकारी पुन्हा नवीन सुरुवातीसाठी साद घालताना दिसतो. एका नवीन सायकलसह आपल्या मुलीला पाहताच त्याला पराकोटीचा आनंद होतो. ‘तुम्हाला आशेचे जेव्हा नवे चाक मिळते तेव्हा तुम्हाला स्वप्नपुर्तीच्या दिशेने जाणे सहज सोपे होते. ’ या भावनात्मक संदेशातून फिल्मचा शेवट होतो.

डब्बेवाल्यांवरील हा डिजीटल व्हिडीओ ओगील्वीने (Ogilvy) तयार केला आहे. त्याबद्दल बोलताना ओगील्वीचे एक्झीक्युटीव्ह क्रिएटीव्ह डायरेक्टर तलहा बिन मोहसीन आणि महेश परब म्हणाले की, लॉकडाऊन हटल्यानंतर आपण सर्व जण जीवन पुन्हा सुरु करण्यासाठी धडपडत आहोत. परंतु मुंबईच्या डब्बेवाल्यांसाठी हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. अनेक महिने ते आपल्या सेवेपासून दूर तर होतेच, परंतु बंधने शिथील झाल्यानंतरही गंजलेल्या सायकलींमुळे त्यांना आपली सेवा पुर्ववत सुरु करण्यासाठी खुपच ध़डपडावे लागत होते. घरी शिजवलेले आरोग्यदायी अन्न मुंबईला पुरविणाऱ्या हजारो डब्बेवाल्यांची रोजीरोटी पुन्हा सुरु करण्यासाठी आम्ही या उपक्रमाद्वारे प्रयत्नशील आहोत. जर शब्दांपेक्षा कृती अधिक सरस ठरत असेल तर आयसीआयसीआय लोम्बार्ड हा नेहमीच इतरांची काळजी घेण्याचे वचन देणारा एक ब्रॅण्ड म्हणून उभा राहतो. आणि म्हणूनच आयसीआयसीआय लोम्बार्डने अशा प्रकारे यंदाच्या दिवाळीला भेट देण्याच्या आणि वचन पाळण्याच्या उत्सवात खऱ्या अर्थाने रुपांतरित केले आहे ."

English Summary: mumbai dabewala get gift from icici lombard
Published on: 17 November 2020, 04:50 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)