News

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे १४ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले अतिरिक्त भाजीपाला मार्केट वापराविना पडून आहे. परिणामी बाजार समिती प्रशासनासह व्यापाऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

Updated on 10 February, 2022 12:37 PM IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे १४ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले अतिरिक्त भाजीपाला मार्केट वापराविना पडून आहे. परिणामी बाजार समिती प्रशासनासह व्यापाऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. 

या अतिरिक्त भाजीपाला मार्केटचे दोनवेळा उद्घाटन करण्यात आले. तरी देखील या ठिकाणी व्यापार सुरु होत नसल्याने बाजार समिती प्रशासन देखील हतबल झाले आहे. तर संबंधित घटकांकडून योग्य पाऊले उचलली जात नसल्याने मार्केट धूळखात पडले असल्याचेही मत काहीजण व्यक्त करत आहेत. केवळ वरवरच्या चर्चा आणि सभा होत असल्याने व्यापारी व प्रशासनास अपयश आल्याचे बोलले जात आहे.२६ वर्षांपूर्वी मुंबई शहरातील भाजीपाला मार्केट नवी मुंबईमध्ये स्थलांतरीत करण्यात आले. त्यावेळी सर्वच व्यापाऱ्यांना जागा आणि परवाने मिळाले नसल्याने नवीन परवाना वाटप करण्यात आले. परिणामी परवानाधारक व्यापाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊन व्यापाराला आणखी अडचणी निर्माण झाल्या.त्यामुळे या व्यापाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्केट उभारण्याची मागणी सुरू झाली. त्यावेळी बाजार समितीच्या परिसरात भाजी मार्केटला लागून ११२३०चौरस मीटर जागेवर २८५ गाळे बांधण्याचा निर्णय तत्कालीन संचालक मंडळाने घेतला. मात्र त्यावेळी उभारलेल्या मार्केटमध्ये व्यवसाय करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. तर आजही मार्केट चालू करण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. 

त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी या ठिकाणचे गाळे व्यापाऱ्या व्यतिरिक्त भाड्याने देण्यास सुरुवात केली आहे. अखेर २ फेब्रुवारी २०११ मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या मार्केटचे उद्घाटन करण्यात आले. मार्केट सुरू झाले पण काही महिन्यांतच ते पुन्हा बंद झाले. १४ वर्ष पूर्ण झाल्यानंतरही येथील मार्केट सुरु होत नसल्याने गाळेधारकांसह व्यापारी हैराण झाले आहेत. मुंबई बाजार समिती परिसरात कोट्यवधी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात आला. त्यामुळे हे मार्केट सुरू होण्यासाठी संबंधित व्यापारी, बाजार समिती प्रशासन व शासनाने योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. तसेच या ठिकाणी भाजीपाला व्यतिरिक्त इतर वस्तूंच्या विक्रीस परवानगी मिळावी यासाठी व्यापाऱ्यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरु केला आहे. शिवाय मार्केटच्या वापरात बदल करण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली. स्थानिक आमदारांनी शासनाकडे पाठपुरावा करून गाळे बंदिस्त करून   दुकानांमध्ये रूपांतर केले गेले. भाजीपाला व्यतिरिक्त इतर कृषी मालाचा व्यापार करण्यास परवानगी देऊन मार्केटला कृषी होलसेल मार्ट असे नाव देण्यात आले.

तरी २९ ऑगस्ट २०१९ ला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. व्यापाऱ्यांनी गाळे सुरू करण्याचा निर्णय घेतला पण प्रत्यक्षात अडीच वर्षांनंतर जवळपास १० टक्केच गाळे सुरू असून इतर गाळे ओस पडले आहेत. तर अतिरिक्त भाजीपाला मार्केटमध्ये कृषी प्रक्रिया केलेल्या वस्तू व इतर व्यवसायास परवानगी मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. मार्केट कसे सुरु करता येईल यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न प्रशासन करत असल्याचे सांगण्यात येत आहे. 
English Summary: Mumbai Agricultural Produce Market Committee's multi-crore project fails; What are the back calculations?
Published on: 10 February 2022, 12:37 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)