शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या योजना याद्वारे शेती करणे सुलभ व्हावे यासाठी सरकार विविध प्रकारच्या योजना आणत आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना शेती हा व्यवसाय फायद्याचा वाटावा व त्यांच्या एकूण उत्पादनात आणि उत्पन्नात वाढ व्हावी हा त्या मागचा उद्देश आहे.
अशीच एक योजना राजस्थान सरकारने शेतकऱ्यांसाठी आणली आहे. या योजनेची चर्चा सगळीकडे होत आहे. नेमकी ही योजना काय आहे याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
राजस्थान सरकारची शेतकऱ्यांसाठी योजना
राजस्थान सरकारने शेतकऱ्यांना सवलत देण्याच्या उद्दिष्टाने मुख्यमंत्री किसान मित्र ऊर्जा योजना सुरू केली आहे.
या योजनेच्या माध्यमातून राजस्थान मधील शेतकऱ्यांना जास्तीच्या विज बिल मधून सुट मिळावी म्हणून कमीत कमी एक हजार रुपये ते बारा हजार रुपये देण्याचे निश्चित केले आहे. सरकारने हे पाऊल शेतकरी बंधूंना समृद्ध करण्यासाठी उचलले आहे
या शेतकऱ्यांना मिळेल मोफत वीज
राजस्थान सरकारने आर्थिक दृष्टीने कमजोर असलेल्या शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी मोफत वीज देण्याचे जाहीर केले आहे. कारण अशा सगळ्या शेतकर्यांना जास्तीच्या वीज बिलं पासून सुटका मिळू शकेल हा त्या मागचा उद्देश आहे. राजस्थान सरकार आपल्या या योजनेला लागू करण्यासाठी आणि याचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा यासाठी सरकारने 1450 कोटी रुपयांचा बजेट प्रस्तावित केला आहे. यासोबतच सरकारने हेसुद्धा जाहीर केले आहे की, ज्या शेतकऱ्यांचे बिल एक हजार रुपयांपेक्षा कमी आहे दिवा येते अशा शेतकऱ्यांना ते बिल भरण्याची आवश्यकता नाही.
कोणत्या शेतकऱ्यांना नाही मिळणार या योजनेचा फायदा?
या योजनेसाठी राजस्थान सरकार कडून काही नियम आणि अटी लागू करण्यात आले आहेत. या अटीचे पालन करणारे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये अशी प्रमुख अट आहे की, जे शेतकरी राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांना कुठल्याही प्रकारचा कर देत नाहीत. यावरून हे स्पष्ट होते की, सरकार अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देऊ इच्छिता जे शेतकरी आर्थिक दृष्टीने कमजोर आहेत. या योजनेचा प्रभाव शेतकऱ्यांवर किती पडेल हे तर येणाऱ्या काळातच कळेल. परंतु आता शेतकऱ्यांमध्ये या योजने मुळे खुशीचे वातावरण आहे.
Published on: 21 July 2021, 11:38 IST