जळगाव : तालुक्यातील शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे तोडलेले कनेक्शन तत्काळ जोडुन द्या. व सक्तीच्या विज बिल वसुली थांबवा या मागणीसाठी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी शेतकऱ्यांनसह जळगाव महावितरण कार्यालयावर २९ नोव्हेंबर रोजी धडक दिली. महावितरणने शेतकऱ्यांनकडुन सक्तिने विज बिलाची वसुली चालु करुन शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे कनेक्शन तोडण्याचा सपाटा जळगाव तालुक्यात चालु केला होता.
अनेक शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे कनेक्शन तोडल्याने शेतातील रब्बी पिके. हरबरा, गहु,कांदा, इतर भाजी पाले सारखे पिके वाळण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे प्रशांत डिक्कर यांनी आक्रमक पवित्रा घेत महावितरणला चांगलेच धारेवर धरले. मुख्य अभियंता डोये अकोला व अधिक्षक अभियंता एस एम आकडे बुलडाणा यांच्या सोबत प्रशांत डिक्कर यांनी फोनवर बोलुन शेतकऱ्यांची सर्व आपबिती कथन केली. शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात असल्यामुळे आतातरी विज बिल भरु शकत नाहीत.
त्यामुळे महावितरणने सामंजस्याची भुमिका घेत सक्तिने बिल वसुल न करता तोडलेले कनेक्शन ३० नोव्हेंबर रोजी जोडून देणार असल्याचे उप कार्यकारी अभियंता एम. ए. कातखेडे यांनी प्रशांत डिक्कर यांना लेखी पत्र देऊन उद्या ३० नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांचे तोडलेले कनेक्शन जोडणार असल्याचे सांगितले.
त्यामुळे जळगाव तालुक्यातील कृषी विज धारक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
प्रशांत डिक्कर यांनी आक्रमक पवित्रा घेत महावितरणला चांगलेच धारेवर धरले , त्यामुळे ३० नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांचे तोडलेले कनेक्शन जोडणार असल्याचे सांगितले.
त्यामुळे जळगाव तालुक्यातील कृषी विज धारक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
प्रतिनिधि - गोपाल उगले.
Published on: 30 November 2021, 07:49 IST