राज्यातील जे कृषिपंप धारक आहेत त्यांचा थकबाकीचा आकडा वर्षानुवर्षे वाढतच निघालेला आहे. प्रत्येक वर्षी शासन वेगवेगळ्या योजना राबवते मात्र यावर्षी कृषिपंपाचे बिल वसूल करण्यासाठी महावितरण कंपनीने एक वेगळीच योजना राबवलेली आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना लाभ तर होणार आहेत त्याबरोबर महावितरणच्या वसुलीमध्ये वाढ होणार आहे. कृषिपंप थकबाकी तसेच सवलतीमध्ये जवळपास १५ हजार ९६ कोटी ६६ लाख रुपये माफ करण्यात आले आहेत त्यामुळे शेतकऱ्याना आता चालू बिल तसेच २०२२ च्या मार्च पर्यंत ५० टक्के रक्कम भरावी लागणार आहे त्यामुळे राज्यातील जवळपास ४४ लाख ५० हजार शेतकऱ्यांना १५ हजार ३५३ कोटी ८८ लाख रुपये ची माफी भेटणार आहे.
शेतकऱ्यांकडे 45 हजार 804 कोटींची थकबाकी:-
कृषीपंपाच्या थकबाकीकडे दुर्लक्ष असल्याने वेगवेगळ्या योजना राबवून आता वसुली करण्यात आली आहे. सध्या थकबाकी १० हजार ४२० कोटी ६५ लाख व त्यावरील ४ हजार ६७६ कोटी रुपये व्याजावर सूट अशा प्रकारे १५ हजार ९६ कोटी ६६ लाख रुपयांची रक्कम माफ करण्यात आलेली आहे. फक्त एवढेच नाही तर वीज बिल दुरुस्तीमध्ये २६६ कोटी ६७ लाख एवढी रक्कम कमी झालेली आहे. सध्या राज्यातील ४४ लाख ५० हजार शेतकऱ्यांकडे ३० हजार ४४१ कोटी रुपये एवढी थकबाकी राहिलेली आहे.
थकबाकीदारांसाठी नवसंजीवनी:-
ज्या शेतकऱ्यांची थकबाकी आहे त्यांच्यासाठी चालू वीज बिल आणि मार्च २०२२ पर्यंतची थकबाकीचा ५० टक्के रक्कम भरावी लागणार आहे यामध्ये त्यांना ५० टक्के रकमेत सवलत मिळणार आहे. राज्यातील ४४ लाख ५० हजार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला तर १५ हजार ३५३ कोटी ८८ लाख रुपये माफ होणार आहेत. ५० टक्के सवलत असा शेतकऱ्यांनी लाभ घेतला पाहिजे.
अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागणार:-
या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी आपले नाव नोंदवले तर त्यांना ५० टक्के सवलत भेटणार आहे मात्र या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर चालू वीज बिलाची रक्कम भरावी लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांचा या योजनेमध्ये भाग नाही त्यांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.
पुणे विभागातील शेतकऱ्यांनी घेतला सर्वाधिक लाभ:-
पुणे विभागातील शेतकऱ्यांनी या योजनेचा सर्वात जास्त लाभ घेतलेला आहे. जे की या योजनेमध्ये ५ लाख ९० हजार ७०५ शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवून थकबाकीमुक्त झालेले आहेत. १ लाख ८४ हजार शेतकरी वीज बिल कोरी झालेली आहेत. पुणे विभागातील शेतकऱ्यांनी मोठा लाभ घेतला आहे.
Published on: 14 December 2021, 05:27 IST