सक्तीची वसुली थांबवा;दिवसा विज पुरवठा करण्याची स्वाभिमानी ची मागणी.
चिखली-सद्या परीस्थीती मध्ये शेतकर्याच्या शेतात हरभरा,गहु पिक उभे आहे.आधीच सततच्या पावसाने हातचे सोयाबीन, उडीद,मुंग गेल्याने शेतकरी मेटाकुटीस आलेला असतांना महावितरण कंपनीकडून पुन्हा एकदा शेतीपंपांचा वीज पुरवठा सक्तीने खंडीत करण्यात येत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी १८तास दिवसा सुळळीत पणे विजपुरवठा करा.आमचे शेतकरी हसी खुशीने विज बिल भरणा करतील
आणि रात्री लाईट न देता दिवसा लाईट द्या अशी मागणी संतप्त होत सरनाईक यांनी महावितरण कडे केली आहे.तर तोडलेले कनेक्शन पुर्ववत करा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडुन करण्यात आली आहे.
चिखली तालुक्यातील अनेक फिडर बंद करण्यात आले तर अनेकांचे कनेक्शन कट करीत डिपींवरील वीज पुरवठा कट करण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या सद्या स्थीतीत जोमात असलेल्या गहु,हरभरा,मक्का,भाजीपाला सह इतर पिकाला त्याचा फटका बसत आहे. विहीरींना थोडेफार पाणी असूनही ते वीज अभावी पिकांना देता येत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.यापुर्वी दोन वेळा महावितरणने तालुक्यातील शेतीपंपाचा वीज पुरवठा खंडीत केला होता
दरम्यान स्वाभिमानी चे रविकांत तुपकर यांनी आक्रमक होत आम्ही अंधारात तर तुम्ही आंधारात म्हणत बुलढाणा महाविरणची लाईटच कट केली होती.तेव्हा जिल्ह्यातील विज पुरवठा पुर्ववत चालू करण्यात आला होता.तर मागील महिण्यातही चिखली तालुक्यात सक्तीचे वसुली होत असल्याने स्वाभिमानी चे विनायक सरनाईक यांनी चिखली महावितरण कार्यालयात सात तास ठिय्या देत शेतकर्याचा विज पुरवठा पुर्ववत केला होता.परंतु महावितरणने आता पुन्हा वीज बिल भरले नाही म्हणून शेतीपंपाचा वीज पुरवठा खंडीत करण्याचा सपाटा लावला असल्याने चिखली तालुक्यात शेतकर्याना दिवसा शेतीपंपासाठी विज देण्याचे सोडुन रात्री २वाजता विज पुरवठा केला जातो आहे.रात्री बेरात्री शेतकर्याना पिकाला पाणी द्यावे लागते आहे.
असे असतांना शेतकर्याचा विचार होणार कधी?असे म्हणत शेतकर्याना सद्या स्थीतीत आठ तास विज दिली जाते ती सुद्धा सुरळीत चालत नाही असे असतांना २४तासातील अठरा तास शेतीपंपासाठी सुरळीत पणे विद्युत पुरवठा केल्यास.आम्ही हसी खुशीत विज बिल भरणा करु असे म्हणत सक्तीने होणारी विज कनेक्शन तोडनी थांबवा व तोडलेले कनेक्शन दोन दिवसात पुर्ववत सुरु करण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमानी चे विनायक सरनाईक यांनी केली आहे.अन्यथा शेतकर्यासह स्वाभिमानी तिव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.
Published on: 02 February 2022, 10:57 IST