मुंबई: शेतकऱ्यांच्या हितासाठी रोजाना सरकार दरबारी अनेक योजनांविषयी वार्तालाप सुरू असतो तर अनेक योजना प्रत्यक्षात अंमलबजावणीसाठी ऊतरविल्या जातात. राज्यातील महावितरण कंपनीद्वारे सुद्धा शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना कार्यान्वित केल्या जातात. सध्या राज्यात कृषी पंपसाठी राज्यातील महावितरण द्वारे योजना सुरू आहेत. या समवेतच आत्ता महावितरण राज्यातील शेतकरी वगळता दुसऱ्या नागरिकांसाठी देखील योजना कार्यान्वित करणार आहे. कृषी ग्राहक वगळता इतर सर्व ग्राहकांसाठी विलासराव देशमुख अभय योजना कार्यान्वित केली जाणार असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यासंबंधीची घोषणा देखील शासनाद्वारे करण्यात आली आहे.
विलासराव देशमुख अभय योजनेमुळे ज्या ग्राहकांचा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे, त्यांना थकीत वीजबिलमध्ये मोठी सवलत दिली जाणार असून पुन्हा एकदा वीज पुरवठा सुरू करण्यात येणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार यामुळे राज्यातील सुमारे 32 लाख ग्राहकांना प्रत्यक्ष फायदा पोहोचणार आहे. ज्या ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित केला केला आहे त्या ग्राहकांना पुन्हा विद्युतपुरवठा बहाल करून एका प्रवाहात आणण्यासाठी ही महत्त्वाकांक्षी योजना राबविली जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या योजनेविषयी खुद्द ऊर्जामंत्री नामदार नितीन राऊत यांनी माहिती दिली आहे.
विलासराव देशमुख अभय योजना नेमकी आहे तरी कशी
मित्रांनो आणि आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, राज्यात सुमारे तीन कोटींहून अधिक लोक महावितरणचे ग्राहक आहेत. असे असले तरी, अनेक लोकांनी महावितरणला वीज बिल देण्याकडे दुर्लक्ष केले होते, अशा ग्राहकांना महावितरण कडून वारंवार मुदतवाढ दिली गेली होती तसेच यासाठी अनेकदा नोटिसा देखील बजावल्या होत्या मात्र ग्राहकांनी महावितरणला विज बिल अदा केलेच नाही, त्यामुळे महावितरणने अनेक थकीत विज बिल ग्राहकांचे कायमस्वरूपी विद्युत पुरवठा बंद केला आहे.
या अशा विद्युत पुरवठा बंद केलेल्या कनेक्शनला PD म्हणून महावितरण संबोधत असते. डिसेंबर 2021 पर्यंत जवळपास 32 लाख ग्राहकांचे कायमस्वरूपी वीज खंडित केली आहे. आता अशा ग्राहकांना पुन्हा एकदा प्रवाहात आणण्यासाठी सवलत दिली जाणार असून, जर अशा ग्राहकांनी एकरकमी थकबाकी दिली तर त्यांना मोठी सवलत दिली जाणार आहे तसेच जे एक रकमी विज बिल भरण्यास असमर्थ आहेत त्यांना इंस्टॉलमेंट मध्ये म्हणजे हफ्त्याद्वारे वीज बिल भरण्यास मुभा दिली जाणार आहे. थकबाकी पूर्ण महावितरणकडे सोपवली गेल्यावरच अशा ग्राहकांना विद्युत पुरवठा देण्यात येणार आहे. विलासराव देशमुख अभय योजना ही योजना मार्च 2022 ते ऑगस्ट 2022 या कालावधीत सुरू राहणार आहे.
थकबाकीदार ग्राहकांनी एक रकमी विज बिल भरण्यास सहमती दर्शविल्यास अशा ग्राहकांना 100% व्याज व अतिरिक्त दंडापासून मुक्तता दिली जाणार आहे. राज्यात जवळपास महावितरणची नऊ हजार कोटी एवढी रक्कम थकित आहे, आणि आज सुमारे सहा हजार कोटी निव्वळ वीजबिल रक्कम आहे. त्यामुळे फक्त मुद्दल जरी वसूल झाली तरी महावितरणची परिस्थिती सुधारणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आणि म्हणूनच विलासराव देशमुख अभय योजणेला मूर्त रूप दिले गेले असल्याचे सांगितले जात आहे.
Published on: 02 March 2022, 12:22 IST