News

गेल्या कित्येक वर्षापासून शेतकरी राजा निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच सुलतानी दडपशाहीमुळे भरडला जात आहे. अस्मानी संकट व सुलतानी संकट या दुहेरी संकटांमुळे शेतकऱ्यांची नेहमीच आर्थिक कोंडी होते. नैसर्गिक आपत्तीचा सामना करत बळीराजा कसा तरी आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवत आहे मात्र अनेकदा प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. याचेच एक उदाहरण समोर आले आहे अहमदनगर जिल्ह्यातून.

Updated on 08 February, 2022 9:26 PM IST

गेल्या कित्येक वर्षापासून शेतकरी राजा निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच सुलतानी दडपशाहीमुळे भरडला जात आहे. अस्मानी संकट व सुलतानी संकट या दुहेरी संकटांमुळे शेतकऱ्यांची नेहमीच आर्थिक कोंडी होते. नैसर्गिक आपत्तीचा सामना करत बळीराजा कसा तरी आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवत आहे मात्र अनेकदा प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. याचेच एक उदाहरण समोर आले आहे अहमदनगर जिल्ह्यातून.

जिल्ह्यातील कवठा परिसरात किरकोळ कामासाठी महावितरणने दोन दिवस वीजपुरवठा खंडित केला. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की कवठा परिसराला देवगाव उपकेंद्रावरून फत्यापुर फिडर अंतर्गत वीज पुरवठा केला जातो. कवठा शिवारातील अनेक शेतकरी सध्या उन्हाळी कांदा लागवडीसाठी लगबग करत आहेत शेतकऱ्यांच्या मते आधीच उन्हाळी कांदा लागवड लांबणीवर पडले आहे आणि त्यात महावितरणने चक्क दोन दिवस किरकोळ कामासाठी वीज पुरवठा खंडित केल्याने शेतकऱ्यांचे आणि शेतमजूराचे मोठे नुकसान झाले आहे. कवठा शिवारातील वीज पुरवठा खंडित केला असल्याने शिवारातील शेतकरी व शेतमजूर दोन दिवस बसून राहिले. शिवारात उन्हाळी कांदा लागवड प्रगतिपथावर आहे आणि अशाच वेळी वीज पुरवठा खंडित केल्याने शेतमजुरांचे व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

परिणामी शिवारातील शेतकऱ्यांनी महावितरणच्या या गलथान कारभारामुळे झालेल्या नुकसानाचे नुकसान भरपाई कोण देणार असा सवाल उपस्थित केला आहे. शिवारात गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याचा वावर असल्याचे सांगितले जात आहे. बिबट्याच्या धाकापोटी रात्रीच्या वेळी शेतकरी बांधव कृषी पंप बंद ठेवतात. शेतकरी बांधव दिवसाच्या वेळी कांदा समवेतच इतर रब्बी हंगामातील पिकांना सिंचन देत असतात. नेवासा तालुक्याच्या देवगाव सबस्टेशन मधून फत्तेपुर फिडर अंतर्गत कवठा व परिसरातील शिवाराला विजेचा पुरवठा केला जातो. फतेपुर शिवारात एक विजेचा खांब पडला म्हणून याच्या दुरुस्तीसाठी महावितरणला तब्बल दोन दिवस लागले. विशेष म्हणजे हे दुरूस्तीचे कार्य महावितरणने दिवसात करण्याचा निर्णय घेतला. शिवारात बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी बांधव रात्री कृषी पंपाचा वापर करीत नाही, आणि दिवसा महावितरण चे काम सुरू त्यामुळे रब्बी हंगामातील कांदा पिकाची लागवड खोळंबली असून यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे व शेतमजुरांचे मोठे नुकसान झाले आहे. 

शिवारातील शेतकऱ्यांनी सांगितलं की, महावितरण शेतकऱ्यांच्या नुकसानीची काळजी न करता भोंगळ कारभार चालवीत आहे. महावितरण शेतकर्‍यांना रात्री-अपरात्री वीज पुरवठा देत असून यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनाशी सर्रासपणे खेळ सुरू असल्याचा आरोप शिवारातील शेतकऱ्यांनी महावितरणवर लावला. देवगाव सबस्टेशनच्या या भोंगळ कारभारामुळे शिवारातील शेतकरी पुरता हतबल झाला असून दिवसा कधीच सुरळीत वीजपुरवठा मिळत नसल्याची तक्रार करत आहे.

English Summary: msedc careless behaviour farmer and labour is in trouble
Published on: 08 February 2022, 09:26 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)