देशात सुशिक्षितांची कमतरता नाही, पण सध्या शिक्षण क्षेत्रात स्पर्धा इतकी वाढली आहे की, आता प्रत्येकाला चांगली नोकरी मिळणे कठीण झाले आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, देशातील नोकऱ्यांची स्थिती अत्यंत गंभीर आहे. सध्या सरकारी ते खाजगी क्षेत्रात फार कमी रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. त्यामुळे बेरोजगारांची संख्या सातत्याने वाढत आहे. लोकांची ही स्थिती पाहता मध्य प्रदेश सरकार त्यांच्या राज्यातील बेरोजगारांसाठी एक महत्त्वाची योजना राबवत आहे.
मध्य प्रदेश सरकारची योजना नेमकी कशी आहे
या योजनेअंतर्गत मध्य प्रदेश सरकार बेरोजगारी भत्ता देते. या योजनेचा लाभ दर महिन्याला सुशिक्षित बेरोजगारांना दिला जातो, जेणेकरून नवीन संधींसाठी त्यांचा उत्साह कायम राहील. निश्चितच मध्य प्रदेश सरकारची ही योजना बेरोजगारांसाठी एक वरदान ठरणार आहे.
किती भत्ता मिळतो
मध्य प्रदेश सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत राज्य सरकारकडून सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा 1500 रुपये भत्ता दिला जातो. विशेष म्हणजे मध्य प्रदेश सरकारच्या या योजनेचा मध्यप्रदेश राज्यातील कोणतीही व्यक्ती तीन वर्षांसाठी या योजनेचा लाभ घेऊ शकते.
कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल
मध्यप्रदेश सरकारने सुरू केलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत भत्ता मिळवण्यासाठी संबंधित अर्जदारांना आपले आधार कार्ड सादर करावे लागणार आहे. शिवाय अर्जदाराला पत्त्याचा पुरावा म्हणून एक डॉक्युमेंट द्यावे लागेल. एवढेच नाही संबंधित बेरोजगारालाप्रमाणपत्र देखील सरकार दरबारी सादर करावे लागेल याशिवाय संबंधित व्यक्तीचे पॅन कार्ड देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय संबंधित अर्जदाराला काही शैक्षणिक कागदपत्रे देखील सादर करावी लागतील यामध्ये दहावी-बारावीचे मार्कशीट यांचादेखील समावेश आहे.
कोण अर्ज करू शकतो
•मध्य प्रदेश सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार मध्य प्रदेश राज्याचा कायमचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.
•मध्यप्रदेश सरकार बेरोजगार भत्ता देणार आहे यामुळे अर्जदार 12वी पास असणे अनिवार्य आहे.
•याशिवाय बेरोजगार भत्तेचा लाभ मिळविण्यासाठी अर्जदार हा 21 ते 35 वर्षे दरम्यान असावा.
•अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा कमी असावे
•अर्जदाराकडे कोणताही रोजगार नसावा.
ऑफलाइन आणि ऑनलाइन अर्ज करता येतो
तुम्हाला या योजनेचा तीन वर्षांसाठी लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये नोंदणी करावी लागेल. याशिवाय बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्जही करू शकता.
त्यासाठी http://mprojgar.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. या वेबसाइटवर दिलेल्या Job Seeker New to This Portal या पर्यायावर क्लिक करा. आता स्क्रीनवर एक फॉर्म दिसेल, तो भरा आणि विनंती केलेली कागदपत्रे संलग्न करा, आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा कोड भरून सबमिट करावी लागतील. या प्रक्रियेसह तुमची ऑनलाइन नोंदणी पूर्ण होईल.
Published on: 08 July 2022, 03:15 IST