सध्या महावितरणची आर्थिक घडी फारशी चांगली नसल्याने, ग्राहकांनी तत्परतेने वीज देयक भरावीत.तरच महावितरण ला आलेल्या आर्थिक संकटातून उभारी मिळणे शक्य आहे. अन्यथा महावितरण कंपनी बंद व्हायला उशीर लागणार नाही, याकडे लक्ष वेधले जात आहे.
ग्राहकांनी प्रत्यक्षात वापरलेल्या विजेचे शुल्क म्हणजेच वीज देयक. जर विजेचा वापर केला गेला नाही तर फक्त स्थिर शुल्क आकारले जाते. त्यामुळे आवश्यक असलेल्या विजेचा वापर होत असताना त्यासाठी आलेले विजेचे शुल्क म्हणजे वीज देयक आहे. हे वीज नियमितपणे देयक भरणे हे ग्राहकांचे कर्तव्य आहे. ना नफा, ना तोटा या तत्त्वावर सेवा देणाऱ्या महावितरणवर एक ग्राहक म्हणून वीजखरेदी, पारेषण खर्च तसेच विविध खर्च आणि त्यांच्या हप्त्यापोटी सद्यस्थितीत कोट्यावधी रुपयांचे देणे असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
सध्याचा विचार केला तर महावितरणच्या वीज ग्राहकांकडे जवळजवळ 71 हजार 578 कोटी रुपयांची थकबाकी आहे त्यामुळे गंभीर आर्थिक संकटामुळे महावितरण अस्तित्वाचा बिकट प्रश्न निर्माण झालेला आहे.घरगुती, शेती, उद्योग आणि व्यवसाय यांसाठी तसेच सार्वजनिक सेवा इत्यादींसाठी वापरलेल्या विजेसाठी नियामक आयोगाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे देयकांच्या आकारणी केली जाते.
ग्राहकांकडे असलेले प्रचंड वीज बिलांची थकबाकी आणि विविध देणीच्या दायित्वाची ओझे असल्याने सद्यस्थितीत देयकांच्या थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित करण्याशिवाय पर्याय नसल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या वीज बिलान मधील थकबाकी रकमेत 66 टक्के सवलत देण्याच्या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.(संदर्भ-लोकसत्ता)
Published on: 08 December 2021, 10:47 IST