News

जिल्ह्यातील जत तालुक्यातील बिळूर येथे दुर्दैवी घटना घडली आहे. बेपत्ता असलेल्या आई व तीन मुलींचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. सुनिता तुकाराम माळी (वय 30), अमृता तुकाराम माळी (वय 13), अंकिता तुकाराम माळी (वय 10), ऐश्वर्या तुकाराम माळी (वय 07 ) असे मृत्यू झालेल्या मायलेकींची नावे आहेत. ही घटना सोमवारी मध्यरात्री 1 वाजता निदर्शनास आली.

Updated on 10 October, 2022 1:14 PM IST

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील बिळूर येथे दुर्दैवी घटना घडली आहे. बेपत्ता असलेल्या आई व तीन मुलींचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. सुनिता तुकाराम माळी (वय 30), अमृता तुकाराम माळी (वय 13), अंकिता तुकाराम माळी (वय 10), ऐश्वर्या तुकाराम माळी (वय 07 ) असे मृत्यू झालेल्या मायलेकींची नावे आहेत. ही घटना सोमवारी मध्यरात्री 1 वाजता निदर्शनास आली.

पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम चंद्रकांत माळी हे गावापासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या सुतार फाट्याजवळ राहतात. घराजवळच त्यांची शेती असून लगतच लिंगनूर तलाव आहे. रविवारी सकाळपासून त्यांची पत्नी सुनीता व तीन मुली बेपत्ता होत्या.

दिवसभर शोधाशोध करूनही चौघीही सापडल्या नाहीत. त्यांनी सासरवाडी कोहळी (ता. अथणी) येथेही विचारणा केली. त्यानंतर त्यांनी जत पोलिसांत बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली. पोलिस, ग्रामस्थ व नातेवाईक यांनी शोधाशोध केल्यानंतर तलावात चौघींचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.

मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या बद्दलच्या रंजक गोष्टी; जाणून घ्या

सोमवारी मध्यरात्री एक वाजता चौघींचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेबद्दल बिळुर भागात उलट सुलट चर्चा सुरू होती. अधिक तपास जत पोलीस करत आहेत.

Ajit Pawar: मुख्यमंत्र्यांकडे लक्ष देऊ नका, आपल्या शेतात कामात लक्ष द्या"

English Summary: Mother drowns in lake with three daughters; Suicide or accident
Published on: 10 October 2022, 01:14 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)