शेतकरी म्हंटल तर पाळीव प्राणी आलेच. त्यातही म्हैस आणि शेतकरी यांचे नातेच वेगळे, म्हैशी पाळून तिच्या दुधातून अनेक शेतकरी आर्थिक नफा कमवतात आणि त्याच्या प्रपंचाला हातभार लागतो.
ज्या घरात गायी, म्हशी असतात त्या घरात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची कधीच कमी भासत नाही. असे घर अगदी परिपूर्ण आणि आनंदी मानले जाते. अनेक शेतकरी दुग्धव्यवसाय करून मोठ्या प्रमाणावर पैसे कमवत आहेत.
आश्चर्य म्हणजे, या म्हशींची किंमत टोयोटा, फॉर्च्युनर गाड्यांपेक्षाही जास्त असते. फॉर्च्युनर ही देशातील लग्झरी कारपैकी एक गाडी आहे. हरियाणाच्या भिवानी भागातील जुई गावचे रहिवासी संजय यांच्याकडे एक तीन वर्षांची म्हैस आहे.
ते तिचा बाळाप्रमाणे सांभाळ करत असून त्यांनी तिला 'धर्मा' असे नाव दिले आहे. ही म्हैस दिवसाला तब्बल १५ किलो दूध देते. हरियाणात सध्या फॉर्च्युनर आणि थार गाडीचा प्रचंड बोलबाला आहे. लोक लाखो रुपये खर्च करून या गाड्या खरेदी करतात.
असे असताना मात्र संजय यांची म्हैस किंमतीच्या बाबतीत या लाखोंच्या गाड्यांनाही मागे टाकते. याबद्दल संजय यांनी सांगितले की, या म्हशीला ४६ लाख रुपयांची मागणी आली होती. मात्र ही किंमत त्यांना मान्य नाही. जेव्हा ६१ लाखांची मागणी येईल.
तेव्हाच ते या म्हशीची विक्री करतील, असे त्यांनी सांगितले आहे. जर खरोखर असे झाले, तर ६१ लाखांमध्ये २ फॉर्च्युनर कार सहज येतील. यामुळे या शेतकऱ्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
Published on: 29 September 2023, 11:36 IST