News

बीडमध्ये अनेक ठिकाणी पाऊस न झाल्याने मोसंबी बागाची पाने गळू लागली आहेत. तसंच पाण्याअभावी फळगळती होऊ लागली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

Updated on 01 September, 2023 3:44 PM IST

बीड 

राज्यात एकीकडे जोरदार पाऊस पडत आहे. तर काही भागात पूरस्थिती निर्माण होऊन शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पण बीड जिल्ह्यात पावसाने हुलकावणी दिल्याने फळबागांचे नुकसान होऊ लागले आहे. त्यामुळ फळे उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. 

बीडमध्ये अनेक ठिकाणी पाऊस न झाल्याने मोसंबी बागाची पाने गळू लागली आहेत. तसंच पाण्याअभावी फळगळती होऊ लागली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. तसंच या भागातील शेतकऱ्यांनी पिकविम्याप्रमाणे फळबागांना अनुदान द्यावे,अशी मागणी जोर धरु लागली आहे.

पंजाबराव शिंदे शेतकरी सांगतात की, दरवर्षी पाऊस हजेरी लावतो पण यंदा २ महिने झाले तरी पावसाने हजेरी लावली नाही त्यामुळे बागेचे नुकसान झाले आहे. माझी दीड एकर मोसंबी बाग आहे पण पाऊस नसल्यामुळे यंदा माझे जवळपास ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जर शासनाला फळबाग उत्पादक शेतकरी जगवायचे असतील तर त्यांनी आम्हाला मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पुढे ते म्हणाले की, कृषिमंत्री धनजंय मुंडे जसे सांगतात की तुम्ही पीकविमा भरा. तसं आम्ही भरतो पण आम्हाला फळबागेचे जास्त अनुदान मिळत नाही. त्यामुळे कृषिमंत्र्यांनी फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे कृषिमंत्री धनंजय मुंडे आता फळबाग उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर येतील का? त्यांना अनुदान देतील का? हे पाहणं महत्त्वाच आहे.

English Summary: Mosambi orchard growers in trouble Help was requested from the Minister of Agriculture
Published on: 31 July 2023, 06:30 IST