सध्या कोरोना काळापासून लोक हे आरोग्याच्या बाबतीत फार जागरूक झाले आहेत. जर आपण शेतीचा विचार केला तर शेतीमध्ये सेंद्रिय व विषमुक्त शेतमालाला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत आहे.
या वाढलेल्या मागणीच्या उद्दिष्टाने आणि उत्पादित सेंद्रीय शेतमालाची मार्केटिंग करण्यासाठी महा ऑर्गानिक अँड रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन अर्थात मोर्फा प्रयत्न करीत असून या संस्थेच्या मदतीने महाराष्ट्रात सेंद्रिय शेतीची चळवळ एक भरारी घेताना दिसत आहे.
या संस्थेच्या स्थापनेची पार्श्वभूमी
आपल्याला माहित आहेच की पिकांवर विविध प्रकारचे रोग व किडींचा प्रादुर्भाव होतो. या पासून पिकांचा बचाव करण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक कीटकनाशकांचा वापर करतात. या अशा रासायनिक कीटकनाशके व खतांचा अविवेकी वापर केल्याने निसर्गाचे चक्र तर बिघडत आहेस परंतु मानवी आरोग्यावर देखील असा विषमुक्त अन्न याचा दूरगामी परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. असे विषयुक्त अन्न खाल्ल्याने कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला देखील अनेकांना सामोरे जावे लागत आहे.
म्हणुन मनुष्याने हा धोका ओळखून वेळीच सावध होणे गरजेचे आहे. हीच समस्या हेरून कृषिभूषण अंकुश पडवळे व प्रल्हाद वरे यांनी माजी कृषीमंत्री शरद पवार यांची 2017 मध्ये भेट घेतली व सेंद्रिय शेतीची गरज व ही शेती करण्यासाठी असलेल्या शेतकऱ्यांच्या पुढील अडचणी यावर सविस्तरपणे चर्चा केली.
इतकेच नाही तर सेंद्रिय शेती पुढील अडचणी त्यांनी लिखित स्वरूपात मांडल्या. या नंतर शरद पवार यांनी 20 सप्टेंबर 2017 मध्ये मांजरी येथे वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये राज्यातील सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची तीन तास बैठक घेऊन मोर्फा या राज्यस्तरावरील संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. यावेळी झालेल्या बैठकीत सेंद्रिय शेती करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व सेंद्रिय उत्पादने व त्यांची मार्केटिंग यामधील येणाऱ्या अडचणींवर सविस्तर चर्चा झाली या माध्यमातूनच या संस्थेचा जन्म झाला. इतकेच नाही तर सेंद्रीय शेतमालाची मार्केटिंग करणे सोपे व्हावे यासाठी शरद पवार यांनी पुण्यातील मगरपट्टा सिटी येथे सवलतीच्या दरात सेंद्रिय शेतमाल विक्रीसाठी ठेवण्यास जागा उपलब्ध करून दिली या नंतर शरद पवार यांनी या संस्थेचे पदाधिकारी, सुपर मार्केटचे प्रतिनिधी व अधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन सेंद्रिय उत्पादन व मार्केटिंग मधील प्रश्न सातत्याने सोडविण्याचा प्रयत्न केला.
मोर्फाचा ब्रँड आहे हेल्दी हार्वेस्ट
या संस्थेच्या माध्यमातून राज्यभरातील शेतकरी जो सेंद्रिय शेतमाल पिकवतील तर या पिकवलेल्या शेतमालाची विक्री नक्की वाचा:ट्रॅफिक पोलिसांनी तुमची गाडी अडवली आणि गाडीची चावी काढली पण तसा अधिकार ट्रॅफिक पोलिसांना आहे का? वाचा नियम
ब्रँडच्या माध्यमातून व्हावी अशी इच्छा शरद पवार यांनी व्यक्त केली व त्यानंतर मॉर्फच्या हेल्थी हार्वेस्ट या ब्रँडची सुरुवात करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून हेल्दी हार्वेस्ट या दुकानांची साखळी मोठ्या शहरांमध्ये उभी करून सेंद्रिय व विषमुक्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाची विक्री करण्याचे नियोजन सुरू आहे. दिनांक 3 सप्टेंबर रोजी मगरपट्टा सिटी पुणे येथे हेल्दी हार्वेस्ट या ब्रँडच्या आउटलेट चे उद्घाटन व भव्य अशा शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
हा या संस्थेचा पहिलाच कार्यक्रम होता व या कार्यक्रमास देशभरातून 6000 सेंद्रीय शेती करणारे शेतकरी उपस्थित होते.
मोर्फाच्या माध्यमातून झालेले फायदे
4मार्च 2019 चा कृषी, सहकार, पणन, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मंत्र्यांच्या बैठकीनंतर अनेक निर्णय राज्य शासनाने घेतले आहेत. यामध्ये शासनाने सेंद्रिय शेती धोरण राज्यस्तरीय समिती स्थापन केली व या समितीमध्ये कृषिभूषण अंकुश पडवळे, प्रल्हाद वरे व स्वाती शिंगाडे यांचाही समावेश करण्यात आला आहे.
सदर समितीचे काम हे सेंद्रिय शेतीचे व्यवस्थित धोरण तयार करून ते शासनाकडे सादर करणे हे आहे. राज्य सरकारने सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणा महाबीज च्या माध्यमातून राबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सिक्कीम नंतर असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशात दुसरे राज्य ठरले आहे. या संस्थेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या चारही मंत्री महोदय यांच्याकडे व त्यांच्या विभागाकडे मांडलेली विविध विषय मार्गी लावण्यासाठी मोर्फाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत.
Published on: 23 March 2022, 03:37 IST