News

कांदा आहे नाशवंत पीक असून जास्त काळ टिकत नाही. त्यासाठीचा उत्तम पर्याय म्हणून कांद्याची साठवणूक जर व्यवस्थित तंत्रज्ञानाने केली तर कांदा साठवणे शक्य होते. त्यासाठी गरज भासते ती कांदा चाळीची.

Updated on 20 February, 2022 9:18 AM IST

कांदा आहे नाशवंत पीक असून जास्त काळ टिकत नाही. त्यासाठीचा उत्तम पर्याय म्हणून कांद्याची साठवणूक जर व्यवस्थित तंत्रज्ञानाने केली तर कांदा साठवणे शक्य होते. त्यासाठी गरज भासते ती कांदाचाळीची.

यामध्ये सगळ्यात मोठी समस्या आहे ती म्हणजे कांदा चाळ उभारायला लागणारा खर्च हा खुपच जास्त असल्याने प्रत्येक शेतकऱ्याला कांदा चाळ उभारणे  शक्य होत नाही. म्हणून या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या कृषी विभागाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून येणाऱ्या दोन वर्षात 14 हजार 141 कांदाचाळी उभारण्याचे ठरवले आहे आणि त्यासाठी जवळजवळ 125 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या योजनेच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात कांदाचाळी बांधल्या जाणार आहेत. या कांदाचाळी शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ घेऊन बांधता येणार आहेत. या संपूर्ण कांदाचाळी यारा राज्यातील 31 जिल्ह्यांमध्ये दोन वर्षात उभ्या केल्या जाणार आहेत. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून कांदा चाळीसाठी शेतकऱ्याला 87 हजार 500 रुपये अनुदान दिले जाते.

 या योजनेचा लाभ कसा घ्यावा?

 कांदा चाळीचे बांधकाम सुरू करण्या अगोदर शेतकऱ्यांनी विहित  नमुन्यातील कांदाचाळी चा आराखडा व अर्ज संबंधित कृषी उत्पन्न बाजार समिती कडून घेणे गरजेचे आहे व त्यानुसारच कांदा चाळीचे बांधकाम करणे सक्तीचे आहे.कांदा चाळीचे बांधकाम केव्हा पूर्ण होईल तेव्हा अनुदानासाठी प्रस्ताव बाजार समिती कडे सादर करावा लागतो.

 शेतकऱ्यांसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

1-विहित नमुन्यातील अर्ज

2- अर्जदाराच्या नाही स्वतःच्या मालकीची जमीन असावी तसेच पाच ते पन्नास मेट्रिक टन क्षमतेची कांदाचा उभारायची असेल तर एक हेक्टर पर्यंत  क्षेत्र असावे. 50 ते 100 मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळीसाठी 1 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असणे गरजेचे आहे.

3-सातबारा उताऱ्यावर कांदा पिकाची नोंद असावी तसेच 8 अ खाते उतारा अर्जासोबत जोडावे लागणार आहे.

4-ज्या शेतकऱ्यांनी वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतले आहे अशा लाभार्थी देखील अनुदानास पात्र राहतील वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या बाबतीत कर्ज मंजुरीचे आदेश पत्र सहपत्रित करणे आवश्यक आहे.

5- जर उभारलेल्या कांदाचाळी चा गैरवापर संबंधित लाभार्थ्यांकडून झाला तर अनुदान दिल्या तारखेपासून व्याजासह वसुली लाभार्थीकडून करण्यात येईल.

6- अर्जासोबत खर्चाची बिले व गोषवारा जोडावा.

7-यापूर्वी कृषी विभागाकडून  अनुदान न घेतल्याचा दाखला जोडावा.

8- पती किंवा पत्नी यापैकी एका सदस्याला अनुदानाचा लाभ घेता येतो.

9- कांदा चाळीचा फोटो अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

English Summary: more than 14 thousand onion storage built next two year by rashtriya vikas yojana
Published on: 20 February 2022, 09:18 IST