News

2014 साली भारतात सत्ता परिवर्तन झाले 70 वर्षाची सत्ताधीश काँग्रेस सत्ताबाहेर झाली आणि देशात भाजप सरकार आले. तेव्हापासून केंद्रातील भाजप सरकारने अनेक कल्याणकारी योजना अमलात आणल्या, तसेच अनेक प्रकल्प कार्यान्वित केले. असाच एक प्रकल्प आहे राष्ट्रीय कृषी बाजार (e-NAM). हा प्रकल्प देशाचे वर्तमान पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक आहे.

Updated on 02 December, 2021 5:59 PM IST

2014 साली भारतात सत्ता परिवर्तन झाले 70 वर्षाची सत्ताधीश काँग्रेस सत्ताबाहेर झाली आणि देशात भाजप सरकार आले. तेव्हापासून केंद्रातील भाजप सरकारने अनेक कल्याणकारी योजना अमलात आणल्या, तसेच अनेक प्रकल्प कार्यान्वित केले. असाच एक प्रकल्प आहे राष्ट्रीय कृषी बाजार (e-NAM). हा प्रकल्प देशाचे वर्तमान पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक आहे.

सरकारच्या ह्या प्रकल्पला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.  राज्यातील जवळपास सव्वा बारा लाख शेतकरी जोडले गेले आहेत. हे शेतकरी ह्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आपला शेती व्यवसाय करत आहेत आणि यातून चांगला नफा देखील कमावीत आहेत. केंद्र सरकारच्या एका अहवालातील माहितीनुसार, महाराष्ट्रातील 257 शेतकरी उत्पादक संघटना (FPO), 20,339 व्यापारी आणि 16,504 कमिशन एजंट या अखिल भारतीय इलेक्ट्रॉनिक व्यापार पोर्टलला जोडले गेले आहेत. एवढेच नाही तर राज्यातील जवळपास सव्वाशे मंडी ह्या ई-नाम नेटवर्कशी जोडल्या गेल्या आहेत, आणि यापैकी 70 च्या आसपास मंड्या ह्या ऑनलाइन व्यापार करीत आहेत. फक्त महाराष्ट्रच नाही तर देशातील इतर राज्ये देखील ह्या प्रकल्पला चांगला प्रतिसाद देत आहेत. जवळपास संपूर्ण भारतवर्षातील 21 राज्यातील शेतकरी या व्यासपीठावर जोडले गेले आहेत आणि हे सर्व शेतकरी कृषी उत्पादनाचा ह्या प्लॅटफॉर्मवर व्यापार करत आहेत.

2014 साली नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले, तेव्हापासून त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक कामे केलीत. असेच एक शेतकऱ्यांचे हितासाठी सुरु केलेलं काम म्हणजे ई-नाम. मोदींनी 2016 मध्ये 21 बाजार समित्यासोबत हे ई-नाम सुरु केले. ई-नाम मध्ये शेतकरी नोंदणी करून आपला शेतमाल कुठेही म्हणजे संपूर्ण भारतात चांगल्या दरात विकू शकतात.  या प्लॅटफॉर्मवर आलेल्या शेतकऱ्यांना दलाल आणि आडत्यावर अवलंबून राहावे लागत नाही. आतापर्यंत, मोदी सरकारने ई-नाम ह्या प्लॅटफॉर्मवर जवळपास देशातील एक हजार बाजार समित्या जोडल्या आहेत. आणि सरकारचा प्रयत्न आहे की, या नेटवर्कमध्ये आणखी काही बाजार समित्या आणल्या जाव्या आणि त्यासाठी प्रयत्न देखील सुरू आहेत.

या प्लॅटफॉर्मवर शेतकरी बांधव त्याच्या जवळच्या बाजारपेठेतून आपल्या शेतीमालाची ऑनलाइन विक्री करू शकतात. तसेच, व्यापारी कोठूनही शेतकऱ्यांना ऑनलाईन पैसे पाठवू शकतात. यामुळे शेतकऱ्यांना आपला माल अनेक बाजारपेठांमध्ये ऑनलाईन घेऊन जाता येतो आणि या प्लॅटफॉर्मवर शेतमालाला अधिक खरेदीदार मिळतात. ई-नाम ह्या प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत सुमारे दीडशे कृषी उत्पादनांची खरेदी-विक्री होत आहे. जेव्हा हे प्लॅटफॉर्म नव्याने सुरु करण्यात आले तेव्हा फक्त 25 कृषी उत्पादनांचा यात समावेश होता. भविष्यात अजूनही उत्पादन यात ऍड केले जातील आणि त्यामुळे शेतकऱ्यांना अजूनच सोयीचे होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

English Summary: more farmer connected with e naam online market
Published on: 02 December 2021, 05:59 IST