आपण नेहमी गिनीज बुक आणि इतर लिम्का रेकॉर्डविषयी बातम्या वाचत असतो. हल्ली दररोज कोणींना कोणी रेकॉर्ड करत आहे. पण एखाद्या म्हैशीने विक्रम केल्याची बातमी तु्म्ही कधी ऐकले आहे का? म्हैशीने विक्रम केल्याने सर्वांना आश्चर्य चकित केले आहे. सरस्वती असे या म्हैशीचे नाव असून ही म्हैस आता पंजाबमधील पवित्र सिंह नावाच्या शेतकऱ्याने घेतली आहे.
आधी हरियाणातील हिसार जिल्ह्यात असलेल्या लितानी गावात राहणारे शेतकरी सुखबीर ढांडा यांच्याकडे ही म्हैस होती. या म्हैशीच्या नावा अनेक जागतिक विक्रम आहेत. सरस्वती म्हैस ही मुर्राह जातीची म्हैस आहे. या म्हैशीचा आताचा विक्रम आहे तो तिच्या किंमतीचा. तिची किंमत ऐकून आपल्या पाया खालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. एखाद्या अलिशान गाडीपेक्षा महागडी ही म्हैस आहे. पंजाब येथील लुधियानात राहणारे पवित्र सिंह य़ांनी ही म्हैस ५१ लाख रुपयात खरेदी केली आहे.
याआधी सिंघवा गावातील एका शेतकऱ्याने मुर्राह जातीची म्हैस २५ लाख रुपयात घेतली होती. या म्हैसीचे नाव होते लक्ष्मी. सरस्वतीने लक्ष्मी पेक्षा २६ लाख रुपयांचा भाव अधिक घेत सर्वात महाग म्हैस होण्याचा विक्रम नोंदवला आहे. काही दिवसांपुर्वी पंजाबच्या लुधियानातील डेअरी अण्ड एग्रो एक्सपो स्पर्धेत ३३.१३ लीटर दूध देऊन सरस्वतीने जागतिक विक्रम केला होता. सरस्वतीच्या विक्रमामुळे मालकाला २ लाख रुपयांचे बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले होते.
इतकेच नाही पाकिस्तानच्या म्हैसीला पराभूत करत सरस्वतीने पहिला क्रमांक मिळवला होता. याआधी सर्वाधिक दूध देण्याचा विक्रम आपल्या शेजारील देश पाकिस्तानमधील एका म्हैशीच्या नावावर होता. पाकिस्तानच्या म्हैशीने ३२.५० लिटर दूध दिले होते. सरस्वतीचे मालक सुखबीर म्हणाले की, सरस्वतीला विकण्याची इच्छा नव्हती, पण आपल्याला तिची चोरी होण्याची चिंता होती. फेब्रुवारीमध्ये सरस्वतीची विक्री करण्यात आली, त्यावेळी जनावरे चोरणाऱ्या टोळीने उच्छांद मांडला होता. सुखबीर यांनी ही सरस्वती म्हैस बरवालाच्या खोखा गावातील शेतकरी गोपीरामकडून १ लाख ३० हजारात खरेदी केली होती. दरम्यान या म्हैशीपासून क्लोन बनवला जात आहे. म्हैस सरस्वतीपासून जन्मलेला रेडा नवाब नावाने प्रसिद्ध असून त्याचे वीर्य विकून आपण पैसे कमवत असल्याचे या म्हैशीचे मालक म्हणाले. सरस्वती त्याचा क्लोन बनविण्याचा प्रयत्न तज्ज्ञांकडून केला जात आहे.सरस्वतीपासून जन्मलेल्या रेड्यांची किंमत ४ लाख रुपये आहे.
सोर्स: Livehindustan.com
Published on: 16 April 2020, 02:19 IST