अलिशान गाडीपेक्षा महाग आहे सरस्वती म्हैस; देते ३३ लिटर दूध

16 April 2020 02:13 PM


आपण नेहमी गिनीज बुक आणि इतर लिम्का रेकॉर्डविषयी बातम्या वाचत असतो.  हल्ली दररोज कोणींना कोणी रेकॉर्ड करत आहे.  पण एखाद्या म्हैशीने विक्रम केल्याची बातमी तु्म्ही कधी ऐकले आहे का?  म्हैशीने विक्रम केल्याने सर्वांना आश्चर्य चकित केले आहे. सरस्वती असे या म्हैशीचे नाव असून ही म्हैस आता पंजाबमधील पवित्र सिंह नावाच्या शेतकऱ्याने घेतली आहे.

आधी हरियाणातील हिसार जिल्ह्यात असलेल्या लितानी गावात राहणारे शेतकरी सुखबीर ढांडा यांच्याकडे ही म्हैस होती.  या म्हैशीच्या नावा अनेक जागतिक विक्रम आहेत. सरस्वती म्हैस ही मुर्राह जातीची म्हैस आहे.  या म्हैशीचा आताचा विक्रम आहे तो तिच्या किंमतीचा. तिची किंमत ऐकून आपल्या पाया खालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. एखाद्या अलिशान गाडीपेक्षा महागडी ही म्हैस आहे.  पंजाब येथील लुधियानात राहणारे पवित्र सिंह य़ांनी ही म्हैस ५१ लाख रुपयात खरेदी केली आहे.

याआधी सिंघवा गावातील एका शेतकऱ्याने मुर्राह जातीची म्हैस २५ लाख रुपयात घेतली होती.  या म्हैसीचे नाव होते लक्ष्मी. सरस्वतीने लक्ष्मी पेक्षा  २६ लाख रुपयांचा भाव अधिक घेत सर्वात महाग म्हैस होण्याचा विक्रम नोंदवला आहे.  काही दिवसांपुर्वी पंजाबच्या लुधियानातील डेअरी अण्ड एग्रो एक्सपो स्पर्धेत ३३.१३ लीटर दूध देऊन सरस्वतीने जागतिक विक्रम केला होता.  सरस्वतीच्या विक्रमामुळे मालकाला २ लाख रुपयांचे बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले होते.

इतकेच नाही पाकिस्तानच्या म्हैसीला पराभूत करत सरस्वतीने पहिला क्रमांक मिळवला होता. याआधी सर्वाधिक दूध देण्याचा विक्रम आपल्या शेजारील देश पाकिस्तानमधील एका म्हैशीच्या नावावर होता. पाकिस्तानच्या म्हैशीने ३२.५० लिटर दूध दिले होते.  सरस्वतीचे मालक सुखबीर म्हणाले की, सरस्वतीला विकण्याची इच्छा नव्हती,  पण आपल्याला तिची चोरी होण्याची चिंता होती. फेब्रुवारीमध्ये सरस्वतीची विक्री करण्यात आली, त्यावेळी जनावरे चोरणाऱ्या टोळीने उच्छांद मांडला होता.  सुखबीर यांनी ही सरस्वती म्हैस बरवालाच्या खोखा गावातील शेतकरी गोपीरामकडून १ लाख ३० हजारात खरेदी केली होती.  दरम्यान या म्हैशीपासून क्लोन बनवला जात आहे.  म्हैस सरस्वतीपासून जन्मलेला रेडा नवाब नावाने प्रसिद्ध असून त्याचे वीर्य विकून आपण पैसे कमवत असल्याचे या म्हैशीचे मालक म्हणाले. सरस्वती त्याचा क्लोन बनविण्याचा प्रयत्न तज्ज्ञांकडून केला जात आहे.सरस्वतीपासून जन्मलेल्या रेड्यांची किंमत ४ लाख रुपये आहे.

सोर्स: Livehindustan.com

expensive buffalo than luxurious car baffalo world record haryana sarswati buffalo record महागडी कारपेक्षा महागडी म्हैस म्हैस हरियाणा
English Summary: More expensive buffalo than luxurious car

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.