News

गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस हा उत्तम पर्याय मानला जातो. येथे तुम्हाला चांगले उत्पन्नही मिळते. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशाच एका बचत योजनेबद्दल सांगणार आहोत.

Updated on 11 March, 2021 6:52 PM IST

गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस हा उत्तम पर्याय मानला जातो. येथे तुम्हाला चांगले उत्पन्नही मिळते. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशाच एका बचत योजनेबद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला वार्षिक 6.6 टक्के उत्पन्न मिळते. या योजनेत तुम्हाला एकरकमी रक्कम जमा करावी लागेल आणि त्यावरून तुम्हाला मासिक व्याजाचे उत्पन्न मिळेल. यामध्ये वैयक्तिक योगदानकर्ते साडेचार लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. तर जॉईंट खात्यात 9 लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना असे या योजनेचे नाव आहे. या योजनेचा लॉक-इन कालावधी 5 वर्षांचा आहे. यामध्ये पॉलिसी मॅच्यूअर झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण पैसे मिळतील. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला मासिक व्याज मिळते. चांगला रिटर्न मिळतो. वय वर्ष 10 झाल्यानंतर या पॉलिसीचा तुम्हाला जास्त फायदा मिळतो. अल्पवयीन व्यक्तीच्या नावेही योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेंतर्गत किमान 1 हजार रुपये आणि जास्तीत जास्त साडेचार लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. गुंतवणूकीची रक्कम 100 रुपयांपेक्षा असणे आवश्यक आहे.

 

1 लाख गुंतवणुकीसाठी दरवर्षी मिळतील 6600 रुपये

या योजनेत गुंतवणूक केली तर साधे व्याज मोजले जाते. तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला एका वर्षामध्ये 6600 रुपये आणि दरमहा 550 रुपये मिळतील. म्हणजेच पाच वर्ष दरमहा भेटत राहतील. 2 लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर 1100 रुपये महिन्याला 13,200 रुपये आणि पाच वर्षांत एकूण 66000 रुपये मिळतील. 3 लाख गुंतवणूकीसाठी तुम्हाला 1650 रुपये, 4 लाखांच्या गुंतवणूकीसाठी तुम्हाला 2200 रुपये आणि साडेचार लाख रुपये गुंतवणूकीसाठी 2475 रुपये मिळतील. एका वर्षात 29700 रुपये आणि पाच वर्षात 1 लाख 48 हजार 500 रुपये मिळतील.

 

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या योजनेत जर एक वर्षानंतर आणि तीन वर्षांआधी गुंतवणूक मागे घेतली गेली तर 2% कपात केली जाईल. तीन वर्षानंतर आणि पाच वर्षांआधी खाते बंद केले तर 1 टक्के कपात केली जाईल.

English Summary: monthly income plan'; Money will be received per month
Published on: 25 February 2021, 07:49 IST