Monsoon Update: केरळ बरोबरच देशभरातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनने जोरदार हजेरी लावली, त्यामुळे आता बऱ्याच राज्यात मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे एनडीआरएफला त्याचा सामना करण्यासाठी सतर्क करण्यात आले आहे. देशाची राजधानी दिल्ली आणि परिसरात ढगांची हालचाल सुरू आहे, तर दुसरीकडे तापमानात भारी वाढ झाल्याने आता उष्माही हैराण करत आहे.
27 जूनपर्यंत मान्सून दिल्लीत दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने (IMD) देशातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी लागणार असे सांगितले आहे.
येथे जोरदार पाऊस होणार
IMD अनुसार, दक्षिणेकडील राज्यांमध्ये अजून मुसळधार पाऊस कोसळणार आहे. कर्नाटक, केरळ, गोव्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय बिहार-झारखंडमध्येही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस आणि वादळाचा भारी तडाखा बसत आहे.
आयएमडीनुसार, कोकण, गोवा, किनारी कर्नाटक आणि केरळ आणि माहे येथे पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात 24 ते 26 जून, अंतर्गत कर्नाटकात 24 ते 25 जून, गुजरातमध्ये 22, 25 आणि 26 जूनला जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे.
ईशान्येकडील राज्यांमध्ये पाऊस
IMD नुसार, बंगालच्या उपसागरापासून ईशान्य आणि लगतच्या पूर्व भारतापर्यंत दक्षिण/नैऋत्य वाऱ्यांच्या प्रभावामुळे, 25 आणि 26 जून रोजी जोरदार पावसाचा अंदाज आहे. याशिवाय 23 जून रोजी गंगेच्या पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मान्सून येथे दाखल होईल
IMD नुसार, बिहार-झारखंडमध्ये देखील मोसमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तर भारतातील राज्यांमध्येही आता मान्सून हळूहळू प्रवेश करत आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. बिहारमध्ये 24 ते 26 जून, झारखंडमध्ये 24 आणि 25 जून आणि ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये 24 ते 26 जून दरम्यान पाऊसाचा शक्यता आहे.
Published on: 23 June 2022, 10:40 IST