News

Monsoon Update: भारतीय हवामान विभागाने (IMD) आजपासून पुढील दोन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राजधानी मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे चाळीजवळ भूस्खलन झाले, अनेक ठिकाणी पाणी साचले आणि वाहतूक विस्कळीत झाली. भूस्खलनाच्या घटनेत तीन जण जखमी झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Updated on 06 July, 2022 6:35 PM IST

Monsoon Update: भारतीय हवामान विभागाने (IMD) आजपासून पुढील दोन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राजधानी मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे चाळीजवळ भूस्खलन झाले, अनेक ठिकाणी पाणी साचले आणि वाहतूक विस्कळीत झाली. भूस्खलनाच्या घटनेत तीन जण जखमी झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

पावसाने जनजीवन विस्कळीत केल्याने मुंबईतील एका माणसाने ट्विट केले की, आता प्रवासासाठी कारऐवजी बोटीची गरज आहे. मुसळधार पावसानंतर महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील प्रतापगडकडे जाणाऱ्या रस्त्यावरही दरड कोसळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा ढिगाऱ्याखाली दबल्याचे वृत्त नाही, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे यांनी सांगितले.

IMDचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, गुजरात आणि महाराष्ट्र किनारपट्टीजवळ आणि पश्चिम मध्य प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, त्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMD ने दक्षिण कोकण, गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रासाठी 6 ते 8 जुलै दरम्यान 'रेड अलर्ट' जाहीर करण्यात आला आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे विभागाने म्हटले आहे.

IMD ने उत्तर कोकणासाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे.  विभागाने उत्तर मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात आज 'यलो अलर्ट' जारी केला होता आणि गुरुवार आणि शुक्रवारसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे.  मराठवाड्यात आजपासून पुढील दोन दिवस मुसळधार पावसासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. 

खाजगी हवामान अंदाज कंपनी स्कायमेटने म्हटले आहे की, सक्रिय मान्सूनची स्थिती पुढील 10 दिवस कायम राहील आणि गुरुवार आणि शुक्रवारी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये अतिवृष्टी होऊ शकते.  मुंबईतील चुनाभट्टी परिसरातील नारायण हाडके चाळ दुमजलीवर डोंगरावरून दगड कोसळल्याने एक बालक व अन्य दोघे जखमी झाले.  पालिका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

भूस्खलनामुळे चाळीतील तीन खोल्यांचेही नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, खबरदारीचा उपाय म्हणून नागरी संस्थेने शेजारच्या खोल्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना तेथून हलवले आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकार्‍यांनी सांगितले की लोकल ट्रेन सामान्यपणे चालत होती परंतु काही प्रवाशांनी दावा केला की उपनगरीय ट्रेन सेवेला थोडा विलंब झाला आहे.

'बेस्ट' या महानगरीय बससेवेच्या प्रवक्त्याने सांगितले की, त्यांच्या बससेवा सहा ठिकाणी इतर मार्गांवरून चालवण्यात आल्या. येत्या 24 तासांत मुंबईत आणखी पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे, असे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

English Summary: monsoon update imd gave heavy rain alert (1)
Published on: 06 July 2022, 05:59 IST