नवी दिल्ली: देशात नैऋत्य मोसमी पाऊस (जून ते सप्टेंबर) सर्वसाधारण राहील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. 2019 च्या पावसाळ्यात देशभरात सर्वत्र पाऊस राहील, त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी त्याचा फायदा होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पॅसिफीक (अल निनो/ला निनो) आणि हिंदी महासागरावरच्या समुद्री पृष्ठभाग तापमान स्थिती या भारताच्या मान्सुनवर मोठा प्रभाव टाकणाऱ्या बाबीचे बारकाईने निरीक्षण करण्यात येत आहे. येत्या जुनच्या पहिल्या आठवड्यात भारतीय हवामान विभाग मान्सुन 2019 दुसरा टप्प्याचा अंदाज वर्तवणार आहे.
Published on: 16 April 2019, 07:44 IST