News

देशात कोरोनाचे संकट उभे टाकले आहे, याच दरम्यान मात्र एक सुखद बातमी आहे. ही बातमी म्हणजे दक्षिण पश्चिम मॉन्सून योग्य दिशेने वाटचाल करत आहे. हवामान विभागाच्या मते रविवारी दक्षिण - पश्चिम मॉन्सूनमध्ये देशात सरासरी ३१ टक्के पाऊस पडला आहे.

Updated on 16 June, 2020 6:23 PM IST


देशात कोरोनाचे संकट उभे टाकले आहे, याच दरम्यान मात्र एक सुखद बातमी आहे. ही बातमी म्हणजे दक्षिण पश्चिम मॉन्सून योग्य दिशेने वाटचाल करत आहे. हवामान विभागाच्या मते रविवारी दक्षिण - पश्चिम मॉन्सूनमध्ये देशात सरासरी ३१ टक्के पाऊस पडला आहे. केंद्रीय जल आयोगानुसार, देशात १२३ मोठे जलाशये असून त्यातील पाणी क्षमता ही मागील वर्षाच्या तुलनेने १७३ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ग्रामीण भारतासाठी ही चांगली गोष्ट आहे.  दरम्यान १२ जूनपर्यंत खरीप पिकांची पेरणी (Kharif sowing)  सरासरीने १०.३६ टक्के झाली आहे. देशात यावेळी भाताची पेरणी ही दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक परिसरात झाली. पेरणीच्या कामासाठी शेतकरी मजुरांना गाडी करून आणत आहेत.  पंजाबमधील बरनाला जिल्ह्यातील मोठे शेतकरी पेरणीच्या कामासाठी मजुरांना गाडीतून ने आण करत आहेत. 

रविवारी ७० प्रवाशी मजूर बरनाला आल्यानंतर तेथील शेतकऱ्यांना त्यांच स्वागत मोठ्या उत्साहात केले.  पंजाबमधील शेती क्षेत्रात साधारण ६ लाख प्रवाशी मजदूर काम करत होते. त्यातील ३.८९ लाख मजदूरांना लॉकडाऊनमुळे आपल्या घरी जावे लागले.  दरम्यान हवामान विभागाच्या मते दक्षिण-पश्चिम मॉन्सून आपल्या दिशेत जात आहे. मॉन्सूनचा वाढता जोर पाहता आता पेरणीच्या कामांनीही जोर धरला आहे. कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार, या महिन्यात १२ जून पर्यंत खरीप पिकांची पेरणी वाढली आहे.  भाताची पेरणी ही ५.५९ लाख हेक्टर क्षेत्रात झाली आहे. ही पेरणी सरासरीच्या मानाने २.२२ लाख हेक्टरने जास्त आहे. डाळींची पेरणीही  २.२८ लाख हेक्टर परिसरात झाली आहे. सरासरीच्या मानाने ही पेरणी ०.१७ लाख हेक्टरने कमी आहे. दरम्यान एकूण पिकांची पेरणी ही ७७ लाख हेक्टर पेक्षा जास्त आहे.
 

English Summary: monsoon move on proper way, 10.36 percent sowing done in this kharif still 12 june
Published on: 16 June 2020, 06:13 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)