News

मॉन्सूनने देशातील ७० टक्के भागात धडक दिली आहे. दक्षिण आणि पुर्वेकडील राज्यात आपला रंग दाखवल्यानंतर मॉन्सून आता मध्य प्रदेश, गुजरात आणि उत्तर प्रदेशाच्या पूर्वीकडील भागात सक्रीय झाला आहे. मॉन्सूनने या तीन राज्यात १४ जूनला प्रवेश केला होता आणि दोन दिवसात या भागात जोरदार पाऊस झाला.

Updated on 23 June, 2020 11:03 PM IST


मॉन्सूनने देशातील ७० टक्के भागात धडक दिली आहे.  दक्षिण आणि पुर्वेकडील राज्यात आपला रंग दाखवल्यानंतर मॉन्सून आता मध्य प्रदेश, गुजरात आणि उत्तर प्रदेशाच्या पूर्वीकडील भागात सक्रीय झाला आहे. मॉन्सूनने  या तीन राज्यात १४ जूनला प्रवेश केला होता. दोन दिवसात या भागात जोरदार पाऊस झाला. पुढील २४ तासात उत्तराखंडमध्ये प्रवेश करणार आहे. दरम्यान राजधानी दिल्ली, हरियाणा, पंजाब, आणि पश्चिमी उत्तरप्रदेशात पोहचण्यास दोन ते तीन दिवस लागणार आहेत. दरम्यान महाराष्ट्रातही मॉन्सूनने आपला रंग दाखवत कोकण आणि मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात जोरदार बॉटिग केली.

पूर्व मॉन्सून आणि मॉन्सूनमध्ये आतापर्यंत देशात किती झाला पाऊस -

पुर्व मोसमी आणि मॉन्सूनमध्ये देशात आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि बिहारमध्ये सामान्यपेक्षा ६० टक्के अधिक पाऊस झाला. सुरुवातीच्या म्हणजेच १ जून ते २२ जून दरम्यान  देशातील ६८१ जिल्ह्यामधून २८ टक्के म्हणजे १९१ जिल्ह्यात सामान्यपेक्षा ६० टक्के अधिक पाऊस झाला. २३ टक्के जिल्ह्यात २० ते ५९ पेक्षा जास्त पाऊस झाला.  दक्षिण - पश्चिम मॉन्सून १ जूनला केरळमध्ये दाखल झाला. ४ ते १० जूनच्या दरम्यान कर्नाटक, तमिळनाडू, आणि आंध्रप्रदेशात पोहचला. पुढील पाच दिवसात म्हणजे १५ जूनपर्यंत मॉन्सूनने देशाचा निम्मे भाग व्यापला.  दरम्यान मॉन्सूनचा आतापर्यंतचा वेग हा चांगला आहे. 

मध्य प्रदेश, आणि पुर्व उत्तर प्रदेशात पण आपल्या वेळेआधी म्हणजे एका आठवड्यापूर्वी धडक दिली. दरम्यान पुर्वेकडील राज्यात प्रवेश करण्यासाठी मॉन्सूनला ५ दिवस जास्त लागलेत. साधरण या भागातील राज्यांमध्ये ५ जून पर्यंत मॉन्सून पोहोचत असतो.  दरम्यान मॉन्सून देशाच्या उत्तर पश्चिमी भागात पोहोचलेला नाही. येथे थांबून - थांबून पूर्व मॉन्सूनचा पाऊस होत आहे. आता उत्तराखंडमध्ये तारीख २३ जून म्हणजे आज दाखल होणार आहे.  दिल्ली, हरियाणा आणि पंजाबमध्ये मॉन्सून २४ ते २५ जूनच्या दरम्यान पोहचणार आहे. यासह जम्मू-काश्मीर, लदाख, हिमाचल प्रदेशाच्या काही भागात २५ जून पर्यंत मॉन्सून आपला रंग दाखवेल.

English Summary: monsoon has arrived ahead of schedule in various parts of the country; 191 districts receiving above-average rainfall
Published on: 23 June 2020, 03:41 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)