पुणे
राज्यात ओसरलेला पाऊस पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे. आज (दि.१) कोकणासह, घाटमाथ्यावर तुरळक भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
पावसाने सध्या उघडीप दिली असली तरी पुणे घाट परिसरात हलक्या पावसाची शक्यता हवामाना खात्याने दिली आहे.
मान्सूनने दुसऱ्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात देशभरात नॉर्मल पाऊस राहण्याची शक्यता आहे. यंदा IMD विभागाने देशात ९४ ते १०६ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
दरम्यान, भारतातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. दक्षिण द्वीपकल्पातील बहुतेक भागांमध्ये आणि वायव्य आणि मध्य भारताच्या पश्चिम भागांच्या अनेक भागांमध्ये नॉर्मल पेक्षाही कमी पाऊस होण्याची शक्यता आहे.
Published on: 01 August 2023, 10:40 IST