गेल्या काही दिवसांपासून सर्वजण मान्सून कधी दाखल होणार याची वाट बघत आहेत. असे असताना आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
आज मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. मान्सून आल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरीही समाधानी झाला आहे. यामुळे शेतीच्या कामांना वेग येणार आहे.
विलंबानंतर आज केरळात मान्सूनचे आगमन झालेले आहे. आज केरळमध्ये मान्सूननं धडक दिली. हवामान खात्याने याबाबत माहिती दिली. लवकरच मान्सूनचे राज्यात आगमन होईल.
शेती नाही, कृषी क्षेत्रातील या नोकऱ्या तुम्हाला बनवू शकतात लखपती, लाखात आहे पगार, जाणून घ्या..
एक आठवडा उशिराने मान्सून यंदा केरळमध्ये दाखल झाला. त्यामुळं देशातील अनेक भागांमध्ये नागरिक उकाड्यानं हैराण झाले आहेत. परंतु आता मान्सूनचं आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांच्याच चिंतेला पूर्णविराम लागला आहे.
केरळमधील बऱ्याच भागांमध्ये आज पावसाला सुरुवात झाली आहे. परंतु यावर्षी पाऊस तब्बल ७ दिवसांनी उशिरा दाखल झाला आहे. हवामान खात्याने गुरूवारी मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली.
तुम्ही कधी पांढरा आंबा पाहिला आहे का, जगातील सर्वात अनोखा वाणी आंबा, जाणून घ्या...
केरळच्या अनेक भागांमध्ये चांगला पाऊस झाला. मान्सूनच्या आगमनानं गरमीनं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. विदर्भाच्या काही जिल्ह्यात पुढच्या तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे.
ऊसदरासाठी स्वाभिमानीचे 1 जुलैपासून आंदोलन, राज्यव्यापी आंदोलनाला रायगडावरून सुरुवात
कापूस आणि सोयाबीनच्या हमीभावात वाढ, मोदी सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या किती झालीय वाढ..
शेती नाही, कृषी क्षेत्रातील या नोकऱ्या तुम्हाला बनवू शकतात लखपती, लाखात आहे पगार, जाणून घ्या..
Published on: 08 June 2023, 04:50 IST