News

भंडारा: पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी मोहाडी तालुक्यातील वडेगाव येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या निर्यात उपक्रमा अंतर्गत समुद्री मार्गाने दुबईला पाठविल्या जाणाऱ्या 13 टन मिरचीच्या पहिल्या कंटेनरला रविवारी हिरवी झेंडी दाखविली.

Updated on 29 January, 2020 11:35 AM IST


भंडारा:
 पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी मोहाडी तालुक्यातील वडेगाव येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या निर्यात उपक्रमा अंतर्गत समुद्री मार्गाने दुबईला पाठविल्या जाणाऱ्या 13 टन मिरचीच्या पहिल्या कंटेनरला रविवारी हिरवी झेंडी दाखविली. 
याप्रसंगी बोलताना पालकमंत्री म्हणाले, भंडारा जिल्हा हा अत्यंत कष्टाळू आणि निसर्गाचे वरदान लाभलेला जिल्हा आहे आणि येथून भाजीपाला एक्सपोर्ट करणारे पहिले कंटेनर दुबईला जात आहे, ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे. येथील शेतकऱ्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे शेती करून एक्सपोर्ट करणारे चांगले माध्यम उभे केले आहे.

शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नागपूर येथील मित्राय फॉर्मर्स प्रोड्यूसर कंपनी आणि पुणे येथील युनिटी असोसिएट्स यांनी विविध कृषी उत्पादने एक्स्पोर्ट करण्यासाठी उपक्रम सुरू केला आहे. सहकार खात्याच्या माध्यमातून या शेतकऱ्यांचे हित जोपासणे ही शासनाची जबाबदारी राहणार आहे.

पालकमंत्री यांनी वडेगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभारण्यात आलेल्या आधुनिक फळे व भाजीपाला सुविधा केंद्राची पाहणी केली. यावेळी आमदार राजू कारेमोरे, आशिष जयस्वाल, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव गणेश जगताप, भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, प्रमोद तितीरमारे, महिला काँग्रेसच्या सीमा भुरे, भंडारा शहराध्यक्ष सचिन घनमारे, कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसरचे संचालक अरविंद कारेमोरे, सभापती भाऊराव तुमसरे, गुलराज कुंदवाणी, माजी खासदार मधुकर कुकडे व पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, आमदार कारेमोरे आणि कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील अनेक प्रश्न मांडले. हे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार पावलं उचलीत आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि भंडारा जिल्हा स्वस्त दुकानदार संघटनेच्या वतीने पालकमंत्र्यांच्या शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. वडेगाव येथे पंधरा दिवसापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर कडून सुविधा केंद्र हस्तांतरित केल्यानंतर निर्यात उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती मित्राय फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन प्रफुल्ल बांडेबुचे यांनी दिली. या केंद्राद्वारे 45 टन भेंडी यापूर्वी हवाईमार्गाने निर्यात करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. 3 फेब्रुवारी नंतर दोन कंटेनर पाठवण्याची योजना आहे. निर्यात उपक्रमा मुळे सुविधा केंद्राने रोजगार निर्मिती केली आहे. असे ते म्हणाले कार्यक्रमाचे संचालन प्रफुल बंडेबुचे यांनी केले.

English Summary: Mohadi's chilli export to Dubai
Published on: 29 January 2020, 11:32 IST