News

मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. यामध्ये पीएम किसान योजना ही एक महत्वाची योजना आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार रुपये दिले जात आहेत. नुकताच या योजनेचा ११ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. यामध्ये मात्र गैरमार्गाने अनेकांनी पैसे मिळवले आहेत. नियम डावलून योजनेचा लाभ अनेकांनी घेतला आहे.

Updated on 16 June, 2022 4:43 PM IST

मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. यामध्ये पीएम किसान योजना ही एक महत्वाची योजना आहे. देशभरातील तब्बल 10 कोटी 50 लाख शेतकरी हे या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार रुपये दिले जात आहेत. नुकताच या योजनेचा ११ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. यामध्ये मात्र गैरमार्गाने अनेकांनी पैसे मिळवले आहेत. नियम डावलून योजनेचा लाभ अनेकांनी घेतला आहे.

असे असताना आता मात्र या शेतकऱ्यांना हे अंगलट येणार आहे, ज्या शेतकऱ्यांनी (Ineligible farmer) अपात्र असतानाही लाभ घेतला आहे त्यांना आता योजनेतील पैशाचा परतावा करावा लागणार आहे. (Nashik) नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील तब्बल 1 हजार 383 अपात्र शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला असून आता त्यांनी शासनाची रक्कम वेळेत अदा न केल्यास त्यांच्या सातबाऱ्यावर त्या रकमेचा बोजा चढविला जाणार आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरु आहे.

आता शासनाची रक्कम देणे बाकी असा शेराच अपात्र शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत परतावा करण्याचे अवाहन येवल्याचे तहसीलदार प्रमोद हिले यांनी केले आहे. यामुळे आता प्रशासनाने याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. ही योजना अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी होती. यासाठी काही अटी देखील होत्या. यामध्ये मंत्री, खासदार, आमदार, सरकारमधील अधिकारी, प्राप्तिकर भरणारे शेतकरी, तसेच 10 हजारांपेक्षा जास्त पेन्शन घेणारे शेतकरी यांना यांना ही योजना लागू होत नाही.

राष्ट्रपती पदासाठी पाच नावे चर्चेत, बड्या नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट

असे असताना मात्र तरी देखील अनेकांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतला, यामध्ये एकट्या येवला तालुक्यातील 1 हजार 383 शेतकऱ्यांनी नियमांना डावलून योजनेचा लाभ घेतला आहे. यामुळे आता त्यांना ही रक्कम परत करावी लागणार आहे. याबाबत यादी महसूल प्रशासनाकडून स्थानिक पातळीवर देण्यात आली असून वसुली मोहिमेला सुरवात झाली आहे.

एका एकरात 10 लाखांची कमाई!! टोमॅटोने दोन वर्षांचा दुष्काळच हटवला...

गरीब शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या योजनेचा गैरफायदा अनेक बड्या शेतकऱ्यांनी घेतल्याचे दिसून आले आहे, यामुळे ही कारवाई सुरु झाली आहे. या योजनेतही अनियमितता करुन कोट्यावधी रुपये अपात्र शेतकऱ्यांनी घेतले आहेत. यामुळे आता या शेतकऱ्यांना हे पैसे परत करावे लागणार आहेत. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या;
तब्बल 4 टर्मपासून साखर कारखाना बिनविरोध, राज्यात केलाय वेगळाच आदर्श निर्माण..
राज्यात सहकारी साखर कारखान्यांकडून 41 टक्के साखर निर्यात, महाराष्ट्र राज्याला असाही फायदा
घरात पडेल पैशांचा पाऊस!! 'या' झाडाची करा लागवड, वास्तुशास्त्रात आहे मोठे महत्त्व

English Summary: Modi's 2,000 will come to Anglat, now the burden has come on Satbara Utaraya ..
Published on: 12 June 2022, 12:35 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)