News

पुढच्या वर्षी लाल किल्ल्यावरून पुन्हा देशाला संबोधित करणार असल्याची घोषणा देखील यावेळी पंतप्रधान मोदींनी केली आहे. मणिपूरमधील हिंसाचाराचा संदर्भ देत पंतप्रधान मोदींनी तेथे शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले.

Updated on 01 September, 2023 12:23 PM IST

नवी दिल्ली

आज देश ७७ वा स्वातंत्र दिन साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज १० व्यांदा लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकवला आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदी जनतेला संबोधित देखील केले आहे. या भाषणात पंतप्रधान मोदींनी २०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

पुढच्या वर्षी लाल किल्ल्यावरून पुन्हा देशाला संबोधित करणार असल्याची घोषणा देखील यावेळी पंतप्रधान मोदींनी केली आहे. मणिपूरमधील हिंसाचाराचा संदर्भ देत पंतप्रधान मोदींनी तेथे शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले. भ्रष्टाचार, कुटुंबवाद आणि तुष्टीकरणमुक्त भारत करण्याचे आवाहनही पंतप्रधान मोदींनी केले.

पंतप्रधान मोदी यांनी जनतेला संबोधित करताना अनेक योजनांची घोषणा केली आहे. तसंच अनेक नवीन आश्वासन देखील जनतेला दिली आहेत. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान मोदी यांचं लाल किल्ल्यावरुन हे शेवटच संबोधन आहे. 

दरम्यान, स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी यांचे मार्गदर्शन, भगत सिंह-सुखदेव-राजगुरुसारख्या वीरांच बलिदान नेहमी लक्षात राहणार आहे. त्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं, त्यांना नमन करतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

English Summary: Modi hoisted tricolor at Red Fort Many announcements by Modi while addressing the public
Published on: 15 August 2023, 10:36 IST