केंद्र सरकार म्हणजेच मोदी सरकारने (govt)साल २०२२ - २०२३ च्या हंगामासाठी रब्बी पिकाचे MSP म्हणजेच किमान आधार मूल्य निश्चित केलेले आहे. बुधवारी ज्यावेळी केंद्रीय मंत्री मंडळात बैठक पार पडली होती त्यामध्ये मंजुरी मिळाली की पिकांचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. या बैठकीत जे भाव मंजूर करण्यात आले त्या नुसार गहू या पिकाच्या(crops) हमीभावात ४० रुपये ने वाढ करण्यात आली तर हरभरा या पिकाच्या हमीभवात १३० रुपये ने वाढ करण्यात आली तसेच मोहरी पिकाच्या हमीभावात ४०० रुपये दराने वाढ करण्यात आली आहे.
किमान आधारभूत किमंत वाढवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला:
मोदी सरकारने वस्त्रोद्योग तसेच शेतकरी वर्ग या दोन्ही क्षेत्रांसाठी झालेल्या बैठकीत मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये मोदी मंत्रिमंडळ बैठकीत वस्त्रोद्योग क्षेत्र साठी १०६८३ कोटी रुपयांचे PLI म्हणजेच प्रॉडक्शन लिंक्ड इनसेटिव्स या योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे. मात्र हा निधी ५ वर्षाच्या कालावधीत वस्त्रोद्योग क्षेत्राला दिला जाणार आहे.तसेच बैठकीत शेतकरी वर्गासाठी सुद्धा अनेक प्रकारच्या मोठ्या घोषणा केल्या आहेत. जे की रब्बी पिकांसाठी MSP म्हणजेच किमान आधारभूत किमंत वाढवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतलेला आहे ज्यामुळे देशातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
हेही वाचा:फळे, भाज्या निर्जलीकरणाच्या विविध पध्दती
केंद्र सरकारने केली MPS मध्ये वाढ:
मोदी सरकारने रब्बी पिकाच्या MSP म्हणजेच किमान आधारभूत किमंत मध्ये वाढ करण्याची घोषणा अशा वेळी केली आहे की शेतकरी वर्ग अनेक दिवसांपासून तीन नवीन जे कृषी कायदे सरकारने केले होते त्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. खूप दिवस झाले शेतकरी आंदोलन करत आहेत की ही तीन कृषी कायदे माघारी घेण्यात यावेत आणि यासाठी शेतकरी वर्गाने अनेक संगठना सुद्धा तयार केल्या आहेत. मात्र दुसऱ्या बाजूने सरकारने अगदी स्पष्टपणे सांगितले आह की MSP रुद्ध होणार नाही आणि आज पुन्हा एकदा केंद्र सरकारने रब्बी पिकांच्या MSP मध्ये वाढ झाली आहे असे जाहीर केले आहे.
रब्बी पिकांसाठी MSP साल (2022-23) मध्ये होणारी वाढ:
- 2015 रुपये प्रति क्विंटल ने गहू पिकाच्या MSP मध्ये वाढ करण्यात आलेली आहे.
- 3004 रुपये प्रति क्विंटल ने चना डाळ च्या MSP मध्ये वाढ करण्यात आलेली आहे.
- 1635 रुपये प्रति क्विंटल ने जवस च्या MSP मध्ये वाढ करण्यात आलेली आहे.
- मसूर डाळ च्या MSP मध्ये 5500 रुपये प्रति क्विंटल ने वाढ करण्यात आलेली आहे.
- सूर्यफूल पिकाच्या MSP मध्ये 5441 रुपये प्रति क्विंटल ने वाढ करण्यात आलेली आहे.
- मोहरी पिकाच्या MSP मध्ये 5050 रुपये क्विंटल ने वाढ करण्यात आलेली आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत कोणत्या पिकाच्या MSP मध्ये किती वाढ झाली हे पुढीलप्रमाणे:
- गहु पिकाच्या एम एस पी मध्ये 40 रुपयांची वाढ करण्यात आली.
- हरभऱ्याच्या पिकाच्या एम एस पी मध्ये 130 रुपयांनी वाढ करण्यात आली.
- जवसाच्या एम एस पी मध्ये 35 रुपयांनी वाढ करण्यात आली.
- मसूर डाळीचा एम एस पी मध्ये 400 रुपयांनी वाढ केली.
- सूर्यफूल च्या एम एस पी मध्ये 114 रुपयांनी वाढ करण्यात आली.
- मोहरीच्या एम एस पी मध्ये 400 रुपयांची वाढ करण्यात आली.
Published on: 10 September 2021, 01:23 IST