News

देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दरम्यान अधिक संसर्ग होऊ नये या सरकारने लॉकडाऊन लागू केले आहे. या लॉकडाऊनचा ४ था टप्पा चालू झाला आहे. या लॉकडाऊनमुळे शहरातील अनेकांच्या हातातील कामे गेली आहेत. कोरोनाचे संकट गेल्यानंतर देशात रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.

Updated on 19 May, 2020 4:45 PM IST


देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दरम्यान अधिक संसर्ग होऊ नये या सरकारने लॉकडाऊन लागू केले आहे. या लॉकडाऊनचा ४ था टप्पा चालू झाला आहे. या लॉकडाऊनमुळे शहरातील अनेकांच्या हातातील कामे गेली आहेत. कोरोनाचे संकट गेल्यानंतर देशात रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.या पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्रात केंद्रीय कृषी मंत्र्यांनी युवकांसाठी एक सुवर्ण संधी देऊ केली आहे. शहरातील अनेक मजूर आता गावाकडे येत आहेत, याची दखल घेत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी गावात रोजगार उपलब्ध करुन देण्यावर भर दिला असून  याविषयी त्यांनी मंत्रालयावर आदेश दिले आहेत. एक लाख पेक्षा अधिक गावात सेंद्रिय पीक घेण्याचं मिशन त्यांनी हाती घेतलं आहे. या संदर्भात कृषी मंत्रालयाची बैठक झाली असून यात

या गावात मातीची गुणवत्ता चांगली करण्यावर भर दिला जावा यावर त्यांनी लक्ष केंद्रीत केले. प्रत्येक शेतातील मातीचे स्वास्थ नोंदणी केली जावी, यातून कोणतेच शेत राहू नये. असा आदेश केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी मंत्रालयाला दिला आहे. यासाठी मृदा परीक्षणासाठी गावांमध्ये ३ हजार प्रयोगशाळा स्थापित करण्यात येतील.  यासाठी कृषी, बचत गट, सहकारी संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या तरुणांना माती परीक्षण प्रयोगशाळा उघडण्यास प्राधान्य दिले जाईल. प्रयोगशाळा सुरु केल्यानंतर तीन लोकांना काम मिळते. यामुळे साधारण ९ हजार लोकांना रोजगार मिळणार आहे.

माती परीक्षणाचे फायदे 

माती परीक्षण म्हणजे शेतजमिनीतील अंगभूत रसायने वा जैविकांचे विश्लेषण होय. याद्वारे शेतात कोणते पीक घ्यावे हे नक्की करता येते व कमी खर्चात उत्पादनवाढ होते. माती परीक्षणामुळे पिकांना द्यावयाच्या खताची मात्रा ठरवता येते, व त्यामुळे गैरवाजवी खते देण्यावर नियंत्रण येते. माती परीक्षण करून त्यानुसार केलेल्या लागवडीमुळे पिकांपासून दोनपटीपेक्षा जास्त आर्थिक लाभ मिळवता येतो.  जमिनीमध्ये असलेल्या वेगवेगळ्या अन्नद्रव्यांचे प्रमाण काढणे आणि त्यानुसार पिकांना रासायनिक खतांच्या मात्रा देणे हा माती परीक्षणाचाच मुख्य उद्देश आहे. 

English Summary: modi governmets new plan : everyone can get employment in village
Published on: 19 May 2020, 04:43 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)