News

कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. परंतु देशातील अर्थव्यवस्था मंदावली आहे. देशाची अर्थव्यवस्था लयास जाऊ नये, यासाठी सरकारने लॉकडाऊनमध्ये दिलासा देणारी घोषणा केली आहे.

Updated on 13 April, 2020 12:06 PM IST


कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या विषाणूचा संसर्ग होऊ, नये यासाठी हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. परंतु देशातील अर्थव्यवस्था मंदावली असून देशाची अर्थव्यवस्था लयास जाऊ नये. यासाठी सरकारने लॉकडाऊनमध्ये दिलासा देणारी घोषणा केली आहे. विविध प्रकारच्या १५ उद्योग आणि कारखान्यांसह रस्त्यांवर दुकाने लावणाऱ्यांना काम सुरू करण्याची सरकारने मंजुरी दिली आहे.

यासोबतच, ट्रक, रिपेअरिंग करणाऱ्यांना सुद्धा काम करण्याची परवानगी देण्यात आली. याविषयीची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे. या वृत्तसंस्थेच्या मते, गृह सचिव अजय भल्ला यांना उद्योग सचिव गुरू प्रसाद गुप्ता यांनी या निर्णयाची माहिती दिली. देशाची अर्थव्यवस्था लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये सर्वांना सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करावे लागणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.  सरकारने लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला तो कशा स्वरुपाने लागू केला जाईल याचा सुद्धा विचार केला आहे. या दरम्यान आणखी काही उद्योग आणि व्यवसायांना मंजुरी दिली जाणार, अशी शक्यता आहे. आर्थिक उलाढाल वाढवण्यासाठी आणि लोकांचे उत्पन्न सुरू ठेवण्यासाठी हा निर्णय आवश्यक होता असे सरकारने सांगितले आहे.

आपल्या आदेशामध्ये सरकारने ज्या कंपन्यांना काम सुरू करण्याची परवानगी दिली त्या कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावर येण्यासाठी विचारू शकतात. अशा परिस्थितीत कुणी कामावर येण्यास तयार नसेल तर त्याचा नियमित पगार कंपनीने द्यावे असे बंधन राहणार नाही. तरीही केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि कामगार विभागाने यावर परिस्थिती स्पष्ट करावी असे केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.  मोठ्या कंपन्यांमध्ये एका शिफ्टला केवळ 20-25% कर्मचाऱ्यांनीच यावे. यासोबतच गृहनिर्माण आणि बांधकाम प्रकल्पांना काम सुरू करण्याची परवानगी हवी असल्यास त्यांना आपल्या कामगारांसाठी राहण्याची देखील व्यवस्था करावी लागेल. कंस्ट्रक्शनच्या ठिकाणी पूर्ण स्वच्छता आणि सॅनिटायझेशन राहील याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची राहील.

English Summary: modi governments big decision : fruit, vegetabels seller and Repairing worker free to work
Published on: 13 April 2020, 12:00 IST